यशोगाथा

Agriculture | करावं तेवढं कौतुक कमीच! तब्बल 84 वर्षांच्या आजीबाई करतात 30 एकर शेती, पतीच्या निधनानंतर 5 एकराचे केले 30 एकरात रूपांतर

शेतकरी आणि माती यांचे कधीच न संपणारे ऋणानुबंध आहे. शेतकरी धरती मातेत येणाऱ्या प्रत्येक पिकाचा आदराने स्वीकार करतो. तसेच शेतकरी आपल्या शेतीसाठी जिवाच्या पलीकडे जाऊन काबाडकष्ट करतो.

Agriculture | शेतीसाठी आपल्या जीवाचा शरीराचा आणि वयाचा देखील विचार करत नाही. अशीच एक आश्चर्यचकित करणारी बाब समोर आली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव या गावात राहणारी तब्बल 84 वर्षांची आजीबाई शेतीत राबराब राबून कष्ट करत आहे. जे पाहून तेथील परिसरातील सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. इतकंच नाही, तर या आजीबाईने शासनाचे प्रोत्साहन पारितोषिक देखील पटकावले आहे. चला तर मग या आजीबाई किती शेती करतात आणि किती वार्षिक उत्पन्न मिळवतात हे जाणून घेऊया.

वाचा: Farmer’s Creativity | कौतुकास्पद; या शेतकऱ्याने केले जुगाड, पडीक जमीन तासाभरात झाली पेरणीयोग्य…

‘या’ कारणामुळे आजीबाईंनी कसली कंबर
या आजीबाईंचे नाव मनकर्णाबाई रामराव डोईफोडे असे आहे. खर तर, मनकर्णाबाई यांच्या पतीने आयुष्याच्यामध्येच त्यांची साथ सोडली. मनकर्णाबाई यांचे पती रामराव डोईफोडे यांचे 1972 साली आजारामुळे त्रस्त असल्याने निधन झाले. पतीच्या निधनानंतर मुलांचे संगोपन करण्याचा भार त्यांच्यावर पडला होता. त्यामुळे त्यांच्या भाऊबंदकीमधून पाच एकर इतकी जमीन त्यांच्या वाट्याला आली. त्यामुळे त्यांनी स्वतः च कंबर कसून कुटुंबाचा आर्थिक भार पेलण्यासाठी शेती करण्याचा निर्णय घेतला.

वाचा: कौतुकास्पद, शेतकरी पुत्राने लग्नात ५०० रोपांचे वाटप करून नवआयुष्याला केली सुरुवात…

5 एकरांच्या शेतीत केली ‘इतकी’ वाढ
सुरुवातीला जेव्हा त्या शेती करत होत्या तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या वाट्याला आलेली पाच एकर इतकीच जमीन होती. मात्र प्रचंड काबाडकष्ट करून मनकर्णाबाई डोईफोडे यांनी आज 30 एकर शेती आपल्या नावे केली आहे. वयाच्या या टप्प्यावर येऊन देखील या आजीबाई स्वतः या 30 एकरात काम करतात.

आजीबाईंना ‘या’साठी मिळाले प्रोत्साहन पारितोषिक
सध्या या आजीबाई त्यांच्या शेतामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर, रब्बी हंगामाला हरभरा, गहू, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला यांसारखी पिके घेत आहेत. त्यासह आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे आजीबाईंनी केळीचे उत्पादन घेण्यासाठी त्यांची जमीन सक्षम नसून देखील त्यांनी शेतीमध्ये केळीचे पीक घेतले आहे. इतकेच नाही, तर त्यांनी या केळीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यासाठी या आजीबाईंना 2002 साली महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने नऊ हजार रुपयांचे प्रोत्साहन पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले होते.

आजही आजीबाई आहेत एकदम ठणठणीत
इतके काबाडकष्ट करून देखील या आजीबाई शारीरिकरित्या एकदम ठणठणीत आहे. त्यांना साधा आजपर्यंत चष्मा देखील लागलेला नाही. त्यामुळे त्यांचे सर्वांनाच कौतुक वाटते. सह आजीबाई मोठ्या अभिमानाने लोकांना त्यांची कहाणी सांगत प्रोत्साहन देतात. आजीबाईंनीने आयुष्यात घालवलेला संघर्षमय प्रवासाचे आज चीज झाले आहे. त्या आजकालच्या तरूण पिढीसाठी एक आदर्श बनल्या आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button