ताज्या बातम्या

Income Tax | ….तर तुमच्या घरी पडू शकते आयकर विभागाची धाड ; जाणून घ्या ‘ही’ माहिती

Income Tax |भरपूर संपत्ती असणाऱ्या लोकांवर सतत ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या ( Income Tax) धाडीची टांगती तलवार असते. बड्या-बड्या नेत्यांच्या किंवा उद्योगपतींच्या घरी अधून मधून अशा धाडी पडत असतात. या धाडींमध्ये कोट्यवधींची कॅश समोर येते. हे पैसे बघून आपल्याला हमखास प्रश्न पडतो की, एखादी व्यक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात घरी कॅश ठेऊ शकतो का ?

घरात एवढी कॅश ठेवता येते

पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, यासाठी काही नियम व निकष असतात. नियम व निकषांच्या आधारे तुम्ही घरात किती पैसे ठेऊ शकता हे समजते. नवीन आयकर नियमानुसार, एखाद्या व्यक्ती आपल्या घरात किती कॅश ठेऊ शकते. हे तिच्या आर्थिक कमाईवर ( Salary) ठरते. तसेच पैशाच्या हस्तांतराच्या नोंदीवरून सुद्धा हे ठरवता येते.

कर भरल्याचे पुरावे असणे आवश्यक

कोणत्याही व्यक्तीने तिच्या घरात किती कॅश ( Cash) ठेवावी याला मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या घरात कितीही कॅश ठेऊ शकता. मात्र घरात ठेवलेल्या प्रत्येक पैशाची नोंद तुमच्याकडे असायला हवी. तसेच घरात असलेला पैसा तुम्ही कुठून कमावला आणि त्यावर किती कर भरला याचा पुरावा सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

तर होऊ शकते कारवाई

तुम्ही आयटीआर ( Income Tax returns) भरला नसेल तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. महत्त्वाची बाब म्हणजे जर तुमच्या घरी बेहिशोबी रक्कम सापडली तर त्यावर दंड म्हणून तुम्हाला १३७ टक्के कर आयकर विभागात भरावा लागतो.

या दोन गोष्टी लक्षात ठेवाच

१) तुम्ही जर 50,000 रुपयांच्या वर रक्कम डिपॉजिट करत असाल किंवा ती बँकेतून काढत असाल तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड दाखवावे लागेल. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल.

२)तुम्ही जर २० लाखांच्या वर रक्कम डिपॉजिट करत असाल किंवा ती बँकेतून काढत असाल तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड व आधार कार्ड दाखवावे लागेल.अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Otherwise income tax department will come at your home

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button