शेळीपालनात यशस्वी व्हायचंय! तर अशी निवडा जातीवंत शेळी…
Want to be successful in goat rearing! So choose a breed goat ...
शेळीपालन करताना अनेक प्रश्न उपस्थित असतात. शेळ्यांची निवड पद्धती कशी करावी ? शेळ्यांचे वयोमान किती असावे ? जातीवंत शेळी कशी निवडावी? असे अनेक प्रश्न उपस्थित असतात. त्यामुळे आपण शेळी निवडक पद्धती पाहणार आहोत.
शेळी विकत घेताना ती चांगल्या गुणधर्माची असावी, जातिवंत शेळीची निवड करण्यात यावी, एका वेतात अधिक करडे देणारी असावी व दुधासाठी उत्तम शेळीची निवड करावी, शेळीच्या निवडीवर शेळीपालनाचे यश अवलंबून असते. शेळी पालन करण्यासाठी एक ते तीन वर्षे वयोगटातील शेळ्यांची निवड करणे उत्तम राहते या शेळ्या उत्तम उत्पादन देणाऱ्या असाव्यात म्हणजे पुढील पिढीमध्ये देखील अपेक्षित बदल पाहायला मिळतो. शेळीपालन करताना प्रथम उत्कृष्ट नर व मादी ची निवड करावी. शेळीपालन करताना जास्त वयस्कर असणाऱ्या शेळ्या निवडणे योग्य ठरणार नाही कमी वयाच्या बोकड व शेळी विकत घेतल्यास जास्त दिवस उत्पन्न देऊ शकतात.
शेळीचे वयोमान दातावरून ओळखता येते. करडू जन्मल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये दुधाच्या दाताच्या मधल्या तीन जोड्या येतात चौथी जोडी चौथ्या आठवड्यात येते. ते दात छोटे व धारदार असतात ते काही काळानंतर पडून दुसरे दात येतात. एक ते दीड वर्षात दुधाचे दात पडून कायमचे मोठे दात येतात. तीन ते चार वर्षाच्या कालावधीमध्ये शेळी चे सगळे दुधाचे दात पडून कायमचे दात येतात. यावरून आपल्याला शेळीचे वयोमान कळू शकते.
शेळीची निवड करताना घ्यायची काळजी…
- निवड करताना तिचे गुणधर्म पाहून पूर्वक तिची निवड करावी. शेळी निरोगी व धष्टपुष्ट असावी.
2. शेळीपासून एका वेतात त्यामध्ये अनेक म्हणजे दोन पेक्षा अधिक करडे होण्याची क्षमता असावी.
3. शेळीचे पाय समांतर व मजबूत असावे टाचेवर पुढच्या भागावर जोर देऊन उभारण्या कडे तिचा कल नसावा.
4. दुधासाठी घेतलेली शेळी मंद व लठ्ठ नसावी ती टवटवीत व चपळ असावी.
5. तिचे तोंड लांब असावे नाकपुड्या मोठ्या व लांब असावेत छाती भरदार व रुंद असावी.
6. शेळ्या खरेदी करताना शक्यतो दोनदा व एका वेळेत झालेली शेळी विकत घेणे केव्हाही चांगली.
7. दुधासाठी शेळी घेताना कासेचा आकार मध्यम स्वरूपाचा असावा. दूध काढल्यानंतर त्याचा आकार कमी व्हायला हवा.
8. शेळी शांत स्वभावाची असावी.
बोकडची निवड करताना घ्यावयाची काळजी:
बोकड विकत घेताना, वजन,जात,आहार या बाबींकडे लक्ष द्यावे. बोकड घेताना ते निरोगी ,वजनदार, धष्टपुष्ट, चपळ, भरदार असावे.
पैदाशी जातिवंत असावे, त्याच्या शरीरात कोणते व्यंग नसावे. प्रजननासाठी निवडलेल्या बोकड्या उच्च प्रतीचा असावा.