‘आमचा कांदा आमचा दर’ | भारत बंद ला राज्यात भरपूर प्रतिसाद, पहा ‘ते’ मागण्या कोणते आणि भाव किती?
'Our onion our rate' | A lot of response in the state to Bharat Bandh, see what are the demands and what is the price?
संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदला 26 मार्च रोजी राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. ठीक ठिकाणी दुकाने व बाजारपेठा बंद होत्या. काही शेतकऱ्यांनी महामार्ग, रेल्वे मार्ग देखील रोखले. जवळपास सर्वच विरोधी पक्षांचा या बंद ला चांगलाच पाठिंबा होता. या बंद मध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
मागील चार महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यामध्ये 300 शेतकऱ्यांनी देखील प्राण गमवले आहेत. तरीदेखील सरकारला जाग येत नाही का? या पार्श्वभूमीवर संयुक्त किसन मोर्चा ने भारत बंदचे आवाहन केले होते. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीनही कृषी कायद्याच्या विरोधात तसेच हमीभावाचा कायदा करावा तसेच प्रस्तविक वीजबिल विरोधात आंदोलन करण्यात आले.
दरम्यान नाशिक मधील लासलगाव येथे शेतकऱ्यांनी ‘आमचा कांदा आमचा दर’ असं आंदोलन सुरू केले असून यातून आपल्या शेतमालाचा दर स्वत निश्चित करण्याची मागणी करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून बराच काळ लोटला तरी शेतकरी स्वतःच्या मालाचा दरही ठरू शकत नाही. शेती मधला सगळा नफा व्यापारीवर्ग मध्येच हडप करतो व त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता नांदते. परंतु कष्ट करून देखील शेतकऱ्यांना योग्य भाव मिळात नसल्यामुळे साधे पिकासाठी झालेला खर्च देखील काढू शकत नाही. कमीत कमी कांद्याला 30 रुपये किलो भाव मिळावा अशी आंदोलनकर्त्यांची अपेक्षा आहे.
अवकाळी पाऊस झाला तर बऱ्याचवेळा कांद्याला योग्य दर मिळत नाही. मागील वर्षी झालेल्या गारपिटीमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले होते, यामुळे कांद्याचे दर पडतात असतात त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही.