ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Vihir Bandi | मोठी बातमी! जिल्ह्यातील १०७ गावांमध्ये विहीर आणि बोअरवर बंदी; जाणून घ्या कारण…

Vihir Bandi | जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील १०७ गावांमध्ये विहीर आणि बोअर घेण्यास बंदी (Vihir Bandi) घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, पाणीटंचाई असणाऱ्या गावातील पाण्याच्या स्रोतांपासून ५०० मीटर अंतरावर दुसरा पाण्याचा स्रोत खणण्यास बंदी घालण्यात आली आहे.

ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे, अशी गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.

बंदीची कारणे:

  • जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे.
  • विहिरींद्वारे पाणीपुरवठा करणं गरजेचं आहे.
  • नवीन विहीर किंवा बोअरमुळे विद्यमान पाण्याच्या स्रोतांवर ताण येऊ शकतो.

वाचा|बांधकाम कामगार योजनें’तर्गत कामगारांना आर्थिक सहाय्य ते ‘या’ सुविंधाचा मिळतोय लाभ, त्वरित करा नोंदणी प्रक्रिया

बंदीचा कालावधी:

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त १०७ गावांमध्ये ३० जूनपर्यंत पाणी उपसा करण्यास बंदी घातली आहे.

प्रभावित गावे:

अंबड तालुक्यातील भांबेरी, दहयाळा, गंगाचिचोली, चुर्मापुरी, शिरनेर, झोडेगाव, पागीरवाडी, साष्ट पिंपळगाव, गोंदी, शहागड, वाळकेश्वर, करंजळा, वडीकाळ्या, पिठोरी सिरसगाव, भालगाव, कोठाळा खु., बदनापूर तालुक्यातील आन्वी, सिंधी पिंपळगाव, राळा (आन्दी), शेलगाव, काजळा / पानखेडा, अकोला, ढासला, असोला, हिवराराळा, खादगाव, उजैनपुरी, गोकुळवाडी, खडकवाडी, पिरसावंगी, धामनगाव या गावांचा समावेश आहे.

इतर उपाययोजना:

  • जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
  • नागरिकांना पाणी वाचवण्याचे आवाहन केले जात आहे.
  • पाणीपुनर्भरणासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

Web Title| Vihir Bandi | Big news! Ban on wells and bores in 107 villages of the district; Find out why…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button