ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Vihir Yojna | एक गाव 15 विहीर योजना; नव्या विहिरींसाठी सरकारचे चार लाखांपर्यंत चे अनुदान; वाचा या नवीन राज्य शासन ची सूचना

Vihir Yojna | One village 15 well scheme; Government subsidy of up to four lakhs for new wells; Read this new state government notification

Vihir Yojna | राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेताला पाण्याची सोय करू शकतात. यामुळे (Vihir Yojna) सिंचनाचा विस्तार होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.

2023-24 या वर्षात या योजनेसाठी 10 लाख शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दरवर्षी किमान 15 विहिरींचे बांधकाम सुचवावे.

या योजनेसाठी पात्रता

  • शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • शेतकऱ्याच्या नावे किमान 0.20 हेक्टर व कमाल 6 हेक्टर मर्यादेत जमीन असावी.
  • शेतकऱ्याचे सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्ड संलग्न असणे आवश्यक आहे.
  • प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असावी.
  • भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला आवश्यक आहे.

वाचा : Vihir Anudan Yojana | शेतकऱ्यांना विहीरीसाठी मिळतंय 4 लाख अनुदान; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि नमुना

अर्ज प्रक्रिया

  • शेतकरी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये विहीर अनुदान अर्ज भरावा.
  • अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  • ग्रामपंचायत अर्जाची पडताळणी करून मंजुरी देईल.
  • मंजुरी मिळाल्यानंतर विहीर खोदाई सुरू करता येईल.

विहीर अनुदान मिळवून शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला पाण्याची सोय करून घेता येते. यामुळे सिंचनाचा विस्तार होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.

Web Title : Vihir Yojna | One village 15 well scheme; Government subsidy of up to four lakhs for new wells; Read this new state government notification

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button