ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Vihir Yojna | शेतकऱ्यांच्या सिंचनाची चिंता मिटणार! पहा काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर …

Vihir Yojna | Farmers' irrigation worries will disappear! See what's the plan? Know more...

Vihir Yojna | आज मी तुम्हाला नवीन विहीर खोदाईसाठी मिळणाऱ्या अनुदानाबद्दल माहिती देणार आहे.

नव्या विहीर खोदाईसाठी शेतकऱ्याला चार लाखांपर्यंत अनुदान देता येते. या अनुदानासाठी निधी उपलब्ध असताना(Vihir Yojna) विहीर खोदाई मात्र पुरेशी होत नाही. त्यामुळे आता प्रत्येक ग्रामपंचायतीने खोदाईचे किमान 15 प्रस्ताव पाठवावेत, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

व्हिडिओ पहा..

या सूचनांमुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास मदत होईल.

ग्रामविकास विभागाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यंदा राज्यात दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल विहीर खोदाईकडे राहील. अशा स्थितीत जास्तीत जास्त विहिरींना अनुदान मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

वाचा : Bharat Rice | केंद्र सरकारची ‘स्वस्त धान्य’ योजना; 25 रुपयांमध्ये ‘भारत’ तांदूळ जाणून घ्या योजनेविषयी सविस्तर …

त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या चालू २०२३-२४ वर्षाच्या वार्षिक कृती आराखड्यात विहीर खोदाईला प्राधान्य देण्यात आले आहे. पाच वर्षांत किमान दहा लाख शेतकऱ्यांना नव्या विहीर खोदाईला अनुदान मिळवून द्या, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

“संरक्षित सिंचनाची सुविधा विहीर देते. यातून दुबार पीक घेण्याची संधी शेतकऱ्याला मिळते. त्यामुळे ‘प्रत्येक शेताला पाणी’ ही संकल्पना राज्यात हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला विहीर खोदाईसाठी अनुदान द्यावे, असे धोरण शासनाने ठेवले आहे.

यामुळेच प्रत्येक ग्रामपंचायतीने दरवर्षी किमान 15 विहिरींचे बांधकाम सुचवावे. अर्थात, कमाल कितीही विहिरी सुचवता येतील. परंतु त्यासाठी निश्‍चित केलेल्या नियमांचे पालन बंधनकारक असेल,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.

ग्रामविकास विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की विहिरीसाठी तीन टप्प्यांत अनुदान मिळते. खोदाईपूर्वी तसेच खोदाई 30 ते 60 टक्के झालेली असताना व शेवटी खोदाई पूर्ण झाल्यानंतर अनुदान मिळते. परंतु गैरव्यवहार टाळण्यासाठी या टप्प्यांचे ‘जिओ टॅगिंग’ करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

तर शेतकरी बांधव, तुम्हाला जर नवीन विहीर खोदवाय्ची असेल तर तुमच्या ग्रामपंचायतीत संपर्क साधा. ग्रामपंचायत तुमच्या विहिरीसाठी प्रस्ताव पाठवेल. या प्रस्तावासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागतील, जे अशे प्रकार आहेत

  • तुमचे आधार कार्ड
  • तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा आणि
  • तुमच्या शेतीचा नकाशा

या कागदपत्रांसह तुम्ही लवकरच ग्रामपंचायतीत संपर्क साधा.

तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि अशेस शेतीविषेयक माहिता साठी, आमचे चेनल ला subscribe करा, धन्यवाद

Web Title | Vihir Yojna | Farmers’ irrigation worries will disappear! See what’s the plan? Know more…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button