ताज्या बातम्या

2000 Note|दोन हजारांच्या नोटेला सरकार कडून बाय बाय; चालनातून नोट झाली बाद ! ‘हे’ आहे खरे कारण

2000 Note | रिझर्व्ह बँकेने (RBI) काल (ता.१९) अचानक एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार २ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे या नोटा बदलून घेण्यास किंवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

३० सप्टेंबर पर्यंत नोट चलनात कायम

काही वर्षांपूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या होत्या. त्यावेळी देखील नोटा बदलून घेण्यास वेळ दिला होता. मात्र यावेळी २ हजारांच्या नोटा थेट बंद न करता ही नोट ३० सप्टेंबरपर्यंत चलनात ( currency) कायम ठेवली आहे. तोपर्यंत त्या बँकांत जमा करता येतील.

या कारणामुळे २ हजारांची नोट झाली बंद

रिझर्व्ह बँकेने काल बँकांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, २ हजारांच्या नोटा जारी करणे तत्काळ थांबविण्यात यावे. २ हजारांची नोट ही मोठ्या चलनाची असल्यामुळे काळा पैसा साठवून ठेवण्यासाठी तिचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. म्हणून २०१८-१९ मध्येच रिझर्व्ह बँकेने या नोटेची छपाई बंद केली होती. ‘स्वच्छ नोट धोरणा’चा पाठपुरावा म्हणून २ हजारांची नोट चलनातून मागे घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

२ हजारांची नोट चलनात का आणली होती ?

२०१६ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. यावेळी मोठ्या संख्येने नोटा चलनातून अचानक बाद झाल्यामुळे अर्थव्यवस्थेची गती कायम ठेवणे गरजेचे होते. यासाठी मोठ्या चलनी नोटेची गरज होती. म्हणून २ हजारांची नोट सरकारने चलनात आणली होती.

कधीपासून मिळतील नोटा बदलून?

२३ मे २०२३ पासून चालनातून मागे घेण्यात आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा नागरिकांना बँकांमध्ये बदलून देण्यास सुरुवात केली जाईल. ही प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू राहील. आरबीआयच्या एकूण १९ विभागीय शाखांमध्येही २० हजार रुपयांपर्यंतच्या नाेटा बदलून मिळतील. बँकांचे नियमित कामकाज विस्कळीत होऊ नये, तसेच परिचालन सुविधा कायम राहावी यासाठी ही मर्यादा ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा

Web Title: Currency of 2000 note banned by reserve bank of india

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button