ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agricultural Consultancy | हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांचे पावसाचे अपडेट जारी; तज्ज्ञांकडून जाणून घ्या कृषी सल्ला

Meteorological department releases rainfall update for next five days; Get agricultural advice from experts

Agricultural Consultancy | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस ९ ते १३ सप्टेंबर दरम्यान आकाश आंशिक ते मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक ९, १० व ११ सप्टेंबर २०२३ रोजी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी बहुतांश ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या याच अंदाजानुसार शेतकऱ्यांसाठी तज्ञांनी काय कृषी सल्ला (Agricultural Consultancy) दिला आहे हे जाणून घेऊयात.

वाचा : Agricultural Advice | आज राज्यात पावसाचा अंदाज! तर पुढचे पाच दिवस कसे राहील हवामान? पिक नियोजनासाठी जाणून घ्या हवामान आधारीत कृषी सल्ला

Climate Based Agriculture Advisory | हवामान आधारित कृषि सल्ला

  • मध्यम श्रेणीचा पावसाचा अंदाज लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे (खुरपणी/डवरणी),कृषी रसायनांच्या (कीटकनाशके, बुरशीनाशके इत्यादी) फवारणी ची कामे तसेच उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी.
  • मागील ४-५ दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
  • विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रॅक्टर व इतरधातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे.
  • स्थानिक हवामान अंदाज व सूचना यांचा अंदाज घेऊनच शेती कामाचे नियोजन करावे. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता, शेतकरी व शेतमजूर यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
  • शेतातील कामे शक्यतो सकाळच्या वेळी उरकून घेण्याला प्राधान्य द्यावे. शेतमजुरांना शेतामध्ये एकत्रित समूहाने काम करू न देता दोन व्यक्तीमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे.
  • शेतात आसरा घेताना पाण्याचे स्त्रोत (विहीर, तलाव, नदी इत्यादी), उंच ठिकाणे (झाडे, उंचवटे), धातूचे अवजारे या पासून जास्तीत जास्त अंतरावर आसरा घ्यावा.उंच ठिकाणांवर वीज आकर्षित होत असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये झाडाखाली आसरा घेणे टाळावे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Meteorological department releases rainfall update for next five days; Get agricultural advice from experts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button