ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agricultural Consultancy | राज्यात अवकाळी पावसासह जोरदार गारपिटीचा इशारा, पिकाचा नायनाट होण्यापूर्वीच जाणून घ्या कृषी सल्ला

Agricultural Consultancy | भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर च्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार,
पुढील पाच दिवस दिनांक 4 ते 8 मार्च 2023 दरम्यान आकाश आंशिक (Agricultural Consultancy) ते अंशतः ढगाळराहण्याची अधिक शक्यता
वर्तविण्यात आली आहे. तसेच काही जिल्ह्यांत अवकाळी (Agricultural Consultancy) पावसासह गारपिटीचा अंदाज देखील हवामान (Weather Update) विभागाने वर्तवला आहे. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

वाचा:सोयाबीनच्या दरात होतेय वाढ , जाणून घ्या ताजे बाजार भाव…

कोणत्या जिल्ह्यात होणार अवकाळी पाऊस?
हवामान विभागाकडून राज्यात 6 मार्च संध्याकाळपासून ते बुधवारी 8 मार्चपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नाशिक, येवला, नांदगाव, दिंडोरी, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तसेच खान्देश, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच जोरदार गारपीट होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

वाचा:MBA च्या तरुणांचं काकडीच्या शेतीतून बदललं नशीब! आता करतोय कोटींची उलाढाल, जाणून घ्या

कृषी सल्ला

  • पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, जवस आणि इतर रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील पिकाची कापणी आणि मळणीची कामे करण्याला प्राधान्य द्यावे व पुढील 2-3 दिवसात उरकून घ्यावी.
  • पावसाचा अंदाज लक्षात घेता आंतरमशागतीची कामे, खते देण्याची कामे तसेच कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनांच्या फवारणीची कामे पुढील २-३ दिवसामध्ये उरकून घ्यावी.
  • रब्बी हंगामातील पिक काढणी नंतर शेताची नांगरणी करून घ्यावी.
  • मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे.
  • जनावरे हे खुल्या
    पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रक्टर व इतरधातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे.
  • स्थानिक हवामान अंदाज व सूचना यांचा अंदाज घेऊनच शेती कामाचे नियोजन करावे.
  • पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची
    शक्यता लक्षात घेता, शेतकरी व शेतमजूर यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
  • शेतातील अति महत्वाची कामे
    शक्यतो सकाळच्या वेळी उरकून घेण्याला प्राधान्य द्यावे.
  • शेतमजुरांना शेतामध्ये एकत्रित समूहाने काम करू न देता
    दोन व्यक्तीमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे.
  • शेतात आसरा घेताना पाण्याचे स्त्रोत (विहीर, तलाव, नदी इत्यादी), उंच ठिकाणे (झाडे, उंचवटे), धातूचे अवजारे या पासून जास्तीत जास्त अंतरावर आसरा घ्यावा.
  • शेतकरी व शेतमजूर यांनी झाडाखाली आसरा घेणे टाळावे तसेच जनावरांचा झाडाखाली आश्रय टाळावा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.


आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Warning of heavy hail with unseasonal rain in the state, know agriculture advice before the crop is destroyed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button