ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Agricultural Advisory | राज्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह बरसणार मेघराजा! जाणून घ्या हवामान आधारीत कृषी सल्ला

Agricultural Advisory | भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस 5 ते 9 जुलै 2023 दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिनांक 5, 8 व 9 जुलै 2013 रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. दिनांक 5, 6 व 7 जुलै 2023 रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनो तुमच्या पिकासाठी काय कृषी सल्ला ( Agricultural Advisory) देण्यात आला आहे हे जाणून घेऊयात.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

कृषी सल्ला

पेरणीयोग्य पुरस्या उपलब्ध ओलाव्याची खात्री करून सोयाबीन ची पेरणी 7 जुलैपर्यंत खरीप तीळ पेरणी 7 जुलैपर्यंत, खरीप ज्वारीची पेरणी 10 जुलैपर्यंत, मकाची पेरणी 7 जुलैपर्यंत वाफसा अवस्थेत करावी. शेतकरी बांधवांनी अन्या ओलाव्याच्या परिस्थितीमध्ये पेरणीची घाई करू नये. किटक नाशकांची फवारणी तसेच उभ्या पिकात खते देण्याची कामे पावसाचा अंदाज लक्षात घेता पुढील 2 दिवस पुढे ढकलावी पुढील 3 दिवसविजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्याव इतर पाळीव जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे, जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव व ट्रॅक्टर व इतरथातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

स्थानिक हवामान अंदाज व सूचना यांचा अंदाज घेऊनच शेती कामाचे नियोजन करावे. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकरी व शेतमजूर यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. शेतातील कामे शक्यतो सकाळच्या वेळी उरकून घेण्याला प्राधान्य द्यावे शेतमजुरांना शेतामध्ये एकत्रित समूहाने काम करून देता दोन व्यक्तीमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे. शेतात आसरा घेताना पाण्याचे स्त्रोत (विहीर, तलाव, नदी इत्यादी), उंच ठिकाणे (झाडे, उचवटे), धातूचे अवजारे या पासून जास्तीत जास्त अंतरावर आसरा घ्यावा उंच ठिकाणांवर वीज आकर्षित होत असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये झाडाखाली आसरा घेणे टाळावे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Meghraja will rain in the state with thunder and lightning! Know Weather Based Agriculture Advice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button