ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! आता प्रति लाभार्थी मिळणार एक किलो तांदूळ अतिरिक्त, जाणून घ्या सविस्तर

Good news for ration card holders! Now each beneficiary will get one kg rice extra, know more

Ration Card | राज्य शासनाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेऊन मोठं मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. जेणेकरून या निर्णयांचा फायदा सामान्य जनतेला होईल. राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेतले जातात. आता रेशन कार्ड (Ration Card) धारकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे रेशन कार्डधारक आनंदाने बहरून जाणार आहेत.

वाचा: अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

रेशन धारकांना मिळणार एक किलो तांदूळ अतिरिक्त
आता रेशन कार्ड धारकांना राज्य शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड वर एक किलो तांदूळ अतिरिक्त देण्यात येणार आहे. ज्यामुळे रेशन कार्ड धारकांना मोठा फायदा होणार. राज्यात डिसेंबर पर्यंत मोफत रेशन धान्य नागरिकांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना मिळणारा गव्हाचा कोटा एक किलोने कमी करण्यात येणार आहे. त्याऐवजी नागपूरमधील नागरिकांना तांदूळ एक किलो जास्त देण्यात येणार आहे. या निर्णयानुसार प्रति लाभार्थी 1 किलो गहू आणि 4 किलो तांदूळ मिळणार आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

थेट येणार रेशन आपल्या दारी

अलीकडेच रेशन कार्डधारकांसाठी मंत्रालयीन बैठकीत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. आता मंत्रालयात बैठकीमध्ये राज्य सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानंतर रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानात जाण्याची गरज भासणार नाही. कारण आता ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या धर्तीवर राज्यात ‘रेशन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Web Title: Good news for ration card holders! Now each beneficiary will get one kg rice extra, know more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button