ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
यशोगाथा

गोष्ट एका ध्येयवेड्या तरुणांची: कसे मिळवले भारतातील पहिले ऊसाच्या रसाचे पेटेन्ट…

ही गोष्ट आहे, समीर शेलार ची, समीर हा शिरूर तालुक्यातील छोट्याश्या गावातून पुण्यात इंजिनीरिंग डिग्री घेण्यासाठी आला.
त्याने मेकॅनिकल इंजिनीरिंग चा डिप्लोमा आणि नंतर डिग्री घेतली. त्यानंतर त्याने नामांकित कंपनीत नोकरी केली. पण त्याचे मन काही रमत नव्हते नोकरीत. नंतर त्याने थेट गावाची वाट धरली. गावी उसाचे उत्पन्न मोठया प्रमाणात घेतले जात असे.

त्यामुळे त्याच्या डोक्यात विचार चालू झाले, उसाचा रस बाराही महिने मिळाला तर? पण उसाचा रस साठवून ठेवण्याचे तंत्रज्ञान विकसित नव्हते. समीर ने त्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली आणि त्यामध्ये त्याने यश मिळवले. हेच ते भारतातील उसाच्या रसाचे पहिले पेटेन्ट मिळवण्याचा मान मिळवला. त्याच्या या संशोधन मुळे 12 ही महिने उसाचा रस उपलब्ध होणार आहे.बराच वेळा वस्तू आपल्याजवळच असतात. फक्त्त नजर हवी समीर सारख्या ध्येय वेड्याची……

समीर व त्यांच्या कार्याला मी E-शेतकरी टीम कडून सलाम….

WEB TITLE: The story of an aspiring young man: How to get India’s first patent for sugarcane juice:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button