योजना

अरे वा! सरकार देत आहे महिना 3000 रुपये पहा कोणती आहे योजना…

पंतप्रधान मानधन योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्याचे वय 60 आहे. त्या पात्रधारक शेतकऱ्यांना दर महिन्याला 3000 हजार रुपये पेंशन दिली जाणार आहे. ही योजना बहुतांश जणांना माहित नसल्यामुळे शेतकरी या योजने पासून वंचित आहे. प्रधानमंत्री किसान मान धन योजना सप्टेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आली असून, आर्थिक वर्ष 2021-22 पर्यंत सुमारे 5 कोटी लाभार्थ्यांना संरक्षण देण्याचे उद्दिष्ट होते. नंतर हे लक्ष्य 3 कोटी करण्यात आले.

कोण होईल पात्र?
प्रधानमंत्री किसान मान धन योजना ही अल्प आणि सीमांत शेतकर्‍यांसाठी पेन्शन योजना आहे, ज्यांची 2 हेक्टर क्षेत्रापर्यंत शेती योग्य आहे. त्यांना याचा लाभ मिळू शकतो. 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेंतर्गत नोंदणी करण्यास पात्र आहेत.

सुरक्षा योजना

भाजपा खासदार पी. सी. गड्डीगौदाम म्हणाले की, पीएमकेएमवाय ही एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे, जी आपल्या समाजातील महत्त्वपूर्ण वर्गास आर्थिक सुरक्षा प्रदान करते. ही योजना योग्य प्रकारे अंमलात आणल्यास लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत होईल आणि वृद्ध वयात त्यांना सन्माननीय जीवन जगात येईल. परंतु या योजनेत शेतकऱ्यांचा रस नसल्यामुळे समिती खुश नाही. समितीने कृषी मंत्रालयाला अशा कमी नोंदणीची कारणे शोधण्यासाठी आणि गरज पडल्यास योजनेत योग्य त्या दुरुस्त्या करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरुन ते शेतकर्‍यांना योजनेकडे आकर्षित करू शकतील. ही योजने मध्ये तुम्ही पात्र असाल तर नोंदणी आवश्यक करा.

अशा योजना आणि कृषी विषयावर माहिती पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button