काही दिवसांपूर्वी राज्यात कधी हवेमध्ये गारठा पसरलेला होता. तर अधूनमधून अवकाळी पाऊसही पडत होता. आता मात्र उन्हाच्या झळ पोहचत असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्हे उन्हानं तापू लागले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात उन्हाच्या तीव्र झळा बसायला सुरुवात होणार आहे. राज्यात तापमानात वाढ झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
राज्यात 10 मार्चला काही भागांत कमाल तापमान 37-39 डिग्री सेल्सियस इतके राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना आज उन्हाचा तडाखा बसलाय. अकोला 39 डिग्री सेल्सियस, यवतमाळ 39.4 डिग्री पुणे 31 सेल्सियस तापमान नोंदवलं गेलंय.
गेल्या काही दिवसांपासून हवामानात वेगवान बदल दिसून येत आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 11 मार्चपासून उत्तर भारतात रिमझिम पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने येत्या दोन दिवसांत अनेक राज्यात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. येत्या दोन दिवसांत उत्तराखंड, हिमाचल, काश्मीर, लडाखसह देशांतील बर्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.
Web Title: Be careful! Let’s see how the weather changes today …