ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

MPSC परीक्षेचा तारखेचा गोंधळ मिटला; ” ही ” आहे परीक्षेची तारीख…

राज्यामध्ये कोरोनाचे थैमान वाढत आहे. त्यामुळे MPSC ची परीक्षा पुढे 21 मार्च रोजी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयमुळे विद्यार्थी वर्गात संताप उसळला आहे . त्यामध्ये MPSC च्या तारखा आतापर्यंत पाच वेळा बदल करण्यात आल्याने अजून सात दिवस थांबावे लागणार का? असा प्रश्न आहे.

यामध्ये शेतकरी वर्गातील मुलांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागातून परीक्षेसाठी आलेल्या जास्त अडचण येत आहे. या वेळी बोलताना धनंजय पडळकर म्हणाले, “ या गरजू विद्यार्थ्यांना सरकारने, वीस दिवसा चा भत्ता द्यावा. तसेच ठरलेल्या तारखेला परीक्षा घ्यावी. नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

MPSC च्या तारखेबाबत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे साहेब म्हणाले,” हा निर्णय वाढत्या कोरोना संक्रमणामुळे घेतल्या आहे. या आठवड्यात MPSC 21 मार्च रोजी परीक्षा होईल असे सांगण्यात आले आहे. तसेच त्यांनी विद्यार्थीना आवाहन केले आहे. तुम्ही अभ्यास केला आहे असाच अभ्यास चालूच ठेवा. व कोणी भडकवत असेल तर भडकून जाऊ नका. मी आश्वास्त करतो. वयोमनाची अडचण येणार नाही. झालेल्या गैरसोयबद्दल त्यांनी दिलगीर व्यक्त केली.

WEB TITLE: Confusion over MPSC exam date cleared; “This” is the date of the exam …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button