ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Cast Validity | आता एका दिवसात मिळणार जात वैधता प्रमाणपत्र ; कागदपत्रे व इतर माहिती जाणून घ्या लगेच !

Cast Validity |मागील आठवड्यामध्ये इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. तर येत्या ८ जूनपूर्वी दहावीचा देखील निकाल जाहीर होईल असा अंदाज आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागले आहेत. प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. (Cast Validity Certificate)

एका दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येणार

राज्यातील विद्यार्थ्यांना ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून जागेवरच दाखले दिले जाणार आहेत. अशातच आता विद्यार्थ्यांना एका दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे नियोजन जात पडताळणी समितीने केले आहे. जात पडताळणी कार्यालयाकडून विद्यार्थ्यांना कमीत कमी एका दिवसात आणि जास्तीत जास्त आठ दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

म्हणून घेतला निर्णय

यासाठी विद्यार्थ्यांना www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करायला लागणार आहे. खरंतर जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तीन महिने लागतात. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी समितीकडून अवघ्या आठ ते दहा दिवसांत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने कोणाचा प्रवेश रद्द होऊ नये किंवा प्रवेश मिळू शकला नाही, असे प्रकार होऊ नये. याची दक्षता घेण्याच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणी समितीने हा निर्णय घेतला आहे. याचा गरजू विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

Important Documents | जात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे

१) संबंधित कॉलेजचे पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड
२) अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का शिवाय अर्जदाराचा फोटो
३) अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा
४) अर्जदाराचा जातीचा दाखला झेरॉक्स प्रत
५) अर्जदार वडिलांचा शाळेचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला, वडील अशिक्षित असल्यास तसे शपथपत्र
६) अर्जदाराची आत्या, चुलत्याचा शाळा सोडल्याचा दाखला
७) अर्जदाराचे आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
८) इतर महसुली पुरावे (गाव न. सात, टॅक्स पावती, खरेदीखत, सहा-ड, फेरफार उतारा, गहाणखत, मालमत्तापत्रक)
९) वंशावळ नमुना नं. तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व फॉर्म नं. १७ (शपथपत्र).

Students will get cast validity certificate within one day

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button