कृषी बातम्या

काळ्या गव्हाची शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायदेशीर; या शेती लागवडीतून अधिक उत्पन्न काढायचे आहे? तर बियाणे असे मिळवा..

काळ्या गव्हाची शेती (Black wheat farming) पाहिली का? होय काळ्या गव्हाची शेतीही (Black wheat farming) फायदेशीर ठरत आहे. शेतकऱ्यांचा कल काळ्या गव्हाच्या शेतीकडे वळताना दिसत आहे. सामान्य गव्हापेक्षा काळ्या गव्हाचे उत्पन्नही (Yield of black wheat) चांगले होते. जास्त उत्पादनासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतो. यामध्ये आता काळ्या गव्हाच्या शेतीसाठी (For the cultivation of black wheat) प्रयत्न चालू असताना दिसत आहे. या काळ्या गव्हाच्या शेतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया..

काळ्या गव्हाचे फायदे –

अटॅक,कॅन्सर, डायबिटीज, मानसिक ताणतणाव, गुडघ्यातील दुखणे, ॲनिमिया या सारख्या रोगांवर रामबाण उपयोगी आहे. हा गहू (Wheat) सामान्य गव्हापेक्षा चवीला थोडा वेगळा आहे.

हे ही वाचा –

या गव्हाची लागवड –

सामान्य गव्हा सारखीच या गव्हाची लागवड (Wheat cultivation) केली जाते. गव्हाची लागवड (Wheat cultivation) रब्बी हंगामात होते. याप्रमाणे या गव्हाच्या लागवडीसाठी नोव्हेंबर महिना चांगला ठरेल. या काळात शेतांमध्ये चांगल्या प्रकारे ओलावा असतो, या गव्हासाठी फायदेशीर आहे. नोव्हेंबर नंतर जर लागवड केली तर उत्पन्नामध्ये घट (Decrease in income) होते.

सिंचन पद्धत

जमिनीतील ओलाव्याचे परिस्थिती (Situation)पाहून पाण्याच्या पाळ्या द्याव्या.

खतांचा वापर –

शेताची मशागत करताना (When cultivating the field) झिंक आणि युरिया टाका. लागवडीच्या वेळेस 50 किलो डीएपी, 45 किलो युरिया, 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश तसेच दहा किलो झिंक सल्फेट प्रति एकर प्रमाण द्या.

सात वर्षाच्या संशोधनानंतर काळा गव्हाच्या नवीन प्रजातींना पंजाब मधील मोहाली येथे असणाऱ्या नेशनल एग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट नाबी (National Agricultural Biotechnology Institute Nabi) ने विकसित केले आहेत. संस्थेने शेतकऱ्यांना (To farmers) या गव्हाचे बियाणे उपलब्ध व्हावेत यासाठी बऱ्याच कंपन्यांसोबत करार केला आहे. शेतकरी या कंपन्यांच्या (Of companies) माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांमध्ये उपलब्धतेनुसार गव्हाचे बियाणे खरेदी (Buy wheat seeds) करू शकतात.

काळ्या गव्हाची शेती करण्यासाठी संपर्क –

काळ्या गव्हाची शेती (Black wheat farming) ही देशांमध्ये नवीन आहे त्यामुळे देशात काही शेतकरी (Farmers) ही शेती (farming) करतात. ज्या शेतकऱ्यांना काळ्या गव्हाची शेती (Black wheat farming) करायची आहे. ते 6267086404 या नंबर वर संपर्क करून या गव्हाचे बियाणे खरेदी करू शकता.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button