कृषी बातम्या
ट्रेंडिंग

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 16 कोटी कर्ज वितरण करण्याचे ठेवले उद्दिष्टे..

A major decision by the central government; Aims to disburse 16 crore loans through Kisan Credit Card

केंद्र सरकार (Central Government) कोरोनाच्या काळातही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांचा (farmers) किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) चा समावेश करुन घेण्यासाठी सरकार फेब्रुवारी 2020 पासून प्रचार आणि प्रसार करत असताना आपल्याला दिसत आहे. सध्या याच माध्यमातून चालू वर्षात 16 कोटी कर्ज वितरण करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारने (Central Government) समोर ठेवले आहे.

11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली होती.

गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधानांनी सुरू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) मोहिमेनंतर वर्षभरात कोरोनाचे असतानाही राज्ये आणि बँकांच्या सहकार्याने 2 कोटी हून अधिक शेतकऱ्यांना सुमारे अडीच लाख कोटी रुपये मिळाले आहेत. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Kisan Sanman Nidhi) योजनामध्ये 1.58 लाख कोटी रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात 11.37 कोटी शेतकऱ्यांना दिले आहेत.

हे ही वाचा –

योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न –

केंद्रीय योजना (Central plan) ही सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे. यासाठी खास केंद्रीय कृषी मंत्री (Union Minister of Agriculture) याकडे लक्ष देत आहे.

1.5 कोटी रुपयांहून अधिक तरतूद –

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री (Union Minister of Agriculture and Farmers Welfare) नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, केंद्र सरकार (Central Government) कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. एवढेच नाही तर अनेक योजना राबवल्या जात आहेत. 1 लाख कोटी रुपयांचा निधी घेऊन सरकार शेतकऱ्यांच्या शेताजवळ पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी उभे राहिले आहे. पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांनी कृषी आणि मित्र राष्ट्रांच्या क्षेत्रांसाठी विशेष पॅकेज म्हणून 1.5 लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली असून त्याअंतर्गत प्रकल्प सादर होताच कृषी मंत्रालयाचे (Ministry of Agriculture) पथक त्यांना बँकर्सकडून मान्यता देईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास होणार असल्याचे दिसत आहे.

वाचा : मोठी बातमी: LPG कनेक्शन सोबत मिळणार मोफत स्टोव्ह; या योजनेचा लाभ कसा घ्याल?

5.5 कोटी शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार –

डिजिटल कृषी (Digital agriculture) अभियानांतर्गत 5.5 कोटी शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार करण्यात आला आहे. डिसेंबरपर्यंत ८ कोटींपर्यंत शेतकऱ्यांचे (Up to 8 crores of farmers) उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

घर घेयचे आहे? तर SBI ची “फेस्टिव्ह” ऑफर्स पहाच; या योजनेतून 8 लाख रुपयांची होईल बचत, ती कशी? वाचा सविस्तर..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button