ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

PM Kisan Samman Nidhi Scheme: बनावट शेतकर्‍यांना बसणार का केंद्राचा दणका? गावागावात चौकशी सुरू! वाचा सविस्तरपणे…

PM Kisan Samman Nidhi Scheme: Will fake farmers be hit by the Center? Inquiry started in villages! Read in detail

पंतप्रधान किसान सन्मान निधी (Prime Minister’s Farmers Honors Fund) योजना सर्वात लोकप्रिय झाली असून, या योजनेमार्फत शेतकऱ्यांना ( farmers) वर्षाकाठी सहा हजार रुपये भेटतात. शेता साठी लागणारे बियाणे, तसेच इतर सामग्रीसाठी हे सहा हजार रुपये दिले जातात. परंतु या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना न होता, जे बनावट शेतकरी आहेत त्यांना जास्त होत असल्या कारणाने, सरकारने (By the government) आता बनावट शेतकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणारे बनावट शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी गावोगावी चौकशी करण्यात येणार असून, खऱ्या लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

योजने अंतर्गत मिळणारा लाभ तर बंद होईलच खोटी माहिती देऊन या योजनेंतर्गत शेतीसाठीची वार्षिक 6 हजाराची मदत घेणाऱ्यांवर कारवाई (Action) होणार आहे.त्याचीच आता अंमलबजावणी सुरू आहे (Verification of PM Kisan Samman Nidhi Scheme Beneficiaries in India).लाभार्थींचे नाव, मोबाईल नंबर आणि आधार कार्डची (Aadhaar Card) सत्यता तपासली जाईल. तसेच ते शेतकरी आहेत की नाही हेही पाहिलं जाईल. या तपासणीत ज्यांची माहिती खोटी सापडेल त्यांची मदत तातडीने बंद करण्यात येईल.

हेही वाचा :


राज्यात आजपासून पुन्हा निर्बंध! गोंधळून जाऊ नका, वाचा काय आहेत निर्बंध…

सर्व आजारांपासून बचाव करणारा, टोटल प्रोटेक्शन मास्क! वाचा काय आहे त्याची वैशिष्ट्ये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button