ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Onion Export | कांदा निर्यातीला परवानगी! पण ‘इतका’च हजार टन कांदा होणार निर्यात, जाणून घ्या भाव वाढणार का?

Onion Export | Onion export allowed! But 'so many' thousand tons of onion will be exported, do you know if the price will increase?

Onion Export | केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी पूर्णपणे उठवली नसून मर्यादित प्रमाणात ५४ हजार ७६० टन कांदा निर्यातीला (Onion Export) परवानगी दिली आहे. ही निर्यात ३१ मार्च २०२४ पर्यंत चार देशांना होणार आहे. यामध्ये बांगलादेशला सर्वाधिक ५० हजार टन कांदा निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीत कांद्याची मागणी करणाऱ्या देशांना सरकार ते सरकार पातळीवर कांदा निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सरकारने कांदा निर्यातीचा कोटा ठरवून दिला आहे.

वाचा | Dhananjay Munde | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांना 23 कोटी 37 लाख रुपयांचा निधी वितरित

केंद्रीय सचिव रोहीत कुमार सिंह यांनी सांगितले की, बांगलादेशला ५० हजार टन, माॅरिशसला १२०० टन, बहरिनला ३ हजार टन आणि भुटानला ५६० टन कांदा निर्यात करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. ही निर्यात लगेच सुरु होऊ शकते आणि ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यातीवरील बंदी कायम आहे.

कांदा निर्यातीला मर्यादित परवानगी दिल्याने बाजारावर काय परिणाम होईल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. कांदा व्यापारी आणि अभ्यासकांच्या मते, निर्यातीचा कोटा कमी असल्यामुळे बाजारावर मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता नाही. कांदा भावात काहीशी सुधारणा होऊ शकते, पण निर्यातीच्या कोट्यावरून बाजारातील सेंटीमेंट कसे तयार होते हे पाहावे लागेल.

Web Title | Onion Export | Onion export allowed! But ‘so many’ thousand tons of onion will be exported, do you know if the price will increase?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button