ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Dhananjay Munde | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून शेतकऱ्यांना 23 कोटी 37 लाख रुपयांचा निधी वितरित

Dhananjay Munde | Great news for farmers! 23 crore 37 lakh rupees distributed to farmers by Agriculture Minister Dhananjay Munden

Dhananjay Munde | स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने असलेली शेतकरी अपघात विमा योजना (Insurance Plan) आता “शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” या नावाने ओळखली जाईल. या योजनेतून 23 कोटी 37 लाख रुपये इतका निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या हस्ते हा निधी वितरित करण्यात आला. या योजनेअंतर्गत अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक (financial) मदत दिली जाते.

यापूर्वी, महायुती सरकारच्या काळात या योजनेचे विमा योजनेतून सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतरण करण्यात आले होते. यादरम्यानच्या खंडित कालावधीतील अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना काही दिवसापूर्वीच 49 कोटी रुपये इतक्या लाभाचे वितरण करण्यात आले होते.

जनता दरबारातून मदत:

परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबाने धनंजय मुंडे यांच्या जनता दरबारात भेट घेऊन निधी अभावी लाभ मिळाला नसल्याची तक्रार केली होती. यानंतर मुंडे यांनी या योजनेचा आढावा घेऊन खंडित कालावधीतील सर्व प्रकरणे निकाली काढण्यासाठी 49 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला.

वाचा | Dhananjay Munde | कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय! आता बियाणे, खते, कीटकनाशके यासंदर्भात तक्रारीसाठी थेट येणारं व्हॉट्सॲप क्रमांक

कृषी पुरस्कारांच्या रकमेत वाढ:

राज्य सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांच्या रकमेत चौपट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी कृषी पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने आज ही घोषणा पूर्णत्वाला आली आहे. पुरस्कारांची संख्या आणि पुरस्कार विजेत्यांचा भत्ताही वाढविण्यात आला आहे.

या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

धनंजय मुंडे यांच्या या पुढाकाराबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Web Title | Dhananjay Munde | Great news for farmers! 23 crore 37 lakh rupees distributed to farmers by Agriculture Minister Dhananjay Munden

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button