जिल्ह्यांमधील (districts) अतिवृष्टी लोकांसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदत निधी शासनाने (government) मंजुर करून जिल्हा प्रशासनाला दिला आहे. सदर निधी जिल्हा प्रशासनाने सातही तालुक्यातील तहसीलदारांच्या खात्यात पाठवला आहे. त्यामुळे निधीचे वितरण लवकरच संबंधित नुकसानग्रस्तांच्या बॅंक (Bank) खात्यात करण्यात येणार असून नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
वाचा –
जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदत निधी –
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २६ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील ३९९ गावे बाधित झालेली. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे त्यांचे कपडे, घरातील साहित्य, अन्न धान्य व इतर नुकसान झाले होते. नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी उद्भवलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना, मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना, जखमी व्यक्तींना लगेच मदत देणे आवश्यक असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. नुकसानग्रस्तांसाठी आवश्यक असलेल्या मदत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी ५४ कोटी ७२ लाख १७ हजार रुपयांचा मदत निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करुन दिला असून त्याचे आता लवकरच वाटप करण्यात येणार आहे.
वाचा –
शासनाने दिली अशी मदत –
नैसर्गिक आपत्तीमुळे घरे उध्वस्त झाल्यामुळे कपडे तसेच घरगुती भांडी, वस्तूंसाठी अर्थ सहाय्य – २ कोटी ५६ लाख ५ हजार देण्यात येईल. तसेच अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यामुळे जणावरांचा मृत्यू झालेल्यांना एसडीआरफच्या दराने ३९ कोटी २८ लाख तर वाढीव दराने १२ कोटी ३४ लाख रुपयांची अशी एकूण ८ कोटी ५६ हजार ६ हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पूर्णतः नष्ट, अंशतः पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्यांसाठी एसडीआरफच्या दराने ८ कोटी ५६ लाख ६ हजार तर वाढीव दराने मदत देण्यासाठी १० कोटी ४३ लाख ५६ हजार रुपयांचे असे एकूण १८ कोटी ९९ लाख ६२ हजार रुपयांचे अनुदान जाहीर झाले आहे. खरडून गेलेल्या शेती नुकसानीसाठी ३१ कोटी ४ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हस्तकला, हातमाग कारागिर, बारा बलुतेदार यांना एसडीआरफच्या दराने १६ लाख तर वाढीव दराने १ कोटी ८४ लाख अशी एकूण २ कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. पूर व पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्यांसाठी १ कोटी ३० लाख ५० हजार तर टपरीधारकांसाठी २३ लाख ५० हजार, कुक्कुटपपालन शेडच्या नुकसानीसाठी ५ लाख, मदत छावणीमध्ये आश्रय घेतलेल्यांसाठी ४ कोटी ८३ लाख मदत जाहीर करण्यात आली आहे.
तालुक्यांना असा दिला मदत निधी
तालुका निधी
अकोला ४३०१.७७
बार्शीटाकळी १८०.९९
अकोट १७४.२
तेल्हारा ४९.८१
बाळापूर ७६२.०५
पातूर ०.१५
मूर्तिजापूर ३.२
एकूण ५४७२.१७
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा