
कोरोना महामारीमुळे सगळे सर्वच गोष्टी वर परिणाम झाला आहे. नुकतेच हरभरा तूर सोयाबीन यांनी उच्चांकी भाव गाठला. त्या पाठोपाठ आता आंब्याचा दरवळ ही महाग झालेला दिसत आहे.
आंबा म्हंटलं की वर्षातून एकदाच येणारे फळ प्रत्येक जण या आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. मात्र आंब्याची चव घेन्याकराता करिता आता जास्तीची किंमतही मोजावी लागणार आहे. विकेंड लॉकडाऊन मुळे सलग दोन दिवस बाजारपेठा बंद होत्या ,तसेच कोरोनामुळे देखील बाजारपेठेमध्ये आंब्याची आवक घटली आहे ,त्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याचा दर चढा राहिला.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंबा घेण्याकरिता ग्राहकांची मागणी भरपूर राहिली परंतु कोरोनाच्या भीतीमुळे तसेच सलग बाजारपेठा बंद राहिल्यामुळे अत्यल्प आवक असल्यामुळे पुण्याच्या बाजारपेठेमध्ये आंब्याचा भाव वाढलेल्या दिसून आला,पुण्याच्या बाजारपेठेमध्ये एक हजार ते दीड हजार रुपये डझन पर्यंत आंब्याचा भाव गेलेला दिसून आला.
घाऊक बाजारातील हापूस आंब्याचे दर (दर्जानुसार)
*चार ते दहा डझन. = ३०००-६०००
*एक डझन. = ८००- १५००
*कच्चा आंबा पाच ते = २५००-५०००
दहा डझन