Post Office | अरे वाह! पोस्टाने आणली नवी सेवा; आता तुम्हाला पोस्टमनचं देणार पैसे, जाणून घ्या कसा घ्याल लाभ…
Post Office | सामान्य लोकांना तसेच विशेषतः ग्रामीण भागांतील लोकांना बऱ्याचदा पैसे काढण्यासाठी बँकेत किंवा पोस्टात सारखं जावं लागतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथे जागोजागी ATM ची सुविधा नसते. परंतु अडीअडचणीच्या काळात पैसे काढण्यासाठी अनेकाना अडचणी येतात. यासर्व ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या लक्षात (Information) घेऊन पोस्टानं आता अनोखी सेवा सुरू केली आहे.
तसेच या सेवेला ग्रामीण भागातील लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. ग्रामीण भागात जर पाहिलं तर UPI पेमेंट किंवा ATM ची तेवढी मोठी सुविधा नसल्याने अनेकदा अडचणीच्या काळात पैसे लागले तर काढायचे कसे असा मोठा प्रश्न निर्माण होतो. पण मग हीच गरज ओळखून पोस्टानं आता नागरिकांसाठी एक नवीन योजना(Information) आणली आहे. तसेच या योजनेत तुम्हाला तुमच्या पोस्ट खात्याला आधार कार्ड आणि आधार कार्डला लिंक असलेला नंबर द्यायचा आहे. यामुळे तुम्हीला पोस्टमनकडून अडचणीच्या काळात पैसे घेता येणार आहेत. परंतु त्यासाठी ग्राहकांना काय करावं लागणार आहे आणि ही योजना काय आहे ते जाणून घेऊयात.
या योजनेचा लाभ कसा घ्यावा?
तर या योजनेसाठी ग्राहकाचं पोस्टात किंवा बँकेत खातं असायला (Information) हवं. तसेच त्याला आधार कार्ड लिंक हवं. तसेच या योजेअंतर्गत खात्यातून बोटांचे ठसे देऊन पैसे काढता येतात आणि शिल्लक रक्कम देखील तपासता येते. तसेच पैसे काढण्यासाठी ग्राहकाला पोस्टमनकडे बोटांच्या हातांचे ठसे मशीनवर द्यावे लागतात. मग त्यानंतर पोस्टमन पैसे देऊ शकतो. तसेच या योजनेत ग्राहकांकडे आधार क्रमांक असणं बंधनकारक आहे. तसेच एका दिवसात ग्राहकाना १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येते. ही योजना फक्त महाराष्ट्र आणि गोवा इथल्या ग्रामीण भागांमध्येचे राबवली (Information) जात आहे. तसेच लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार या योजनेत आतापर्यंत १ हजार ६०३ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
वाचा: अर्रर्र..! 5 वर्षात पीक विमा कंपन्यांनी कमावला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा अन् शेतकऱ्यांना लावला चुना
या योजनेतून काय लाभ मिळणार?
या योजनेत ग्राहकाला बँकेत किंवा पोस्टात जाण्याचे श्रम वाचतात आणि अडचणीच्या काळात पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. पण या योजनेमुळे बँक ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचत असल्याचं महाराष्ट्र सर्कलच्या मुख्य पोस्ट मास्टर वीणा श्रीनिवास म्हणाल्या(Information) आहेत. तसेच या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- तूर उत्पादकांची चांदी! मिळतोय ‘इतका’ दर; जाणून घ्या उडीद, सोयाबीन आणि कांद्याचे ताजे बाजारभाव
- सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज: कृषी मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी..फक्त ‘एक’ रुपयांमध्ये पिक विमा ! जाणून घ्या सविस्तर बातमी…
Web title : Important news for common people! Now the postman will give you the money at home; Know the detailed information about this plan change