कृषी बातम्या

Crop Insurance |अर्रर्र..! 5 वर्षात पीक विमा कंपन्यांनी कमावला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा अन् शेतकऱ्यांना लावला चुना

५ हजार कोटी रुपयांच्या नफा –

शेतकऱ्याला वेळोवेळी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत असते. नुकसान ( Losses ) भरुन निघावं म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना ( Pradhan Mantri Fasal Bima yojana ) सुरु केली होती. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ एप्रिल २०१६पासून योजना सुरु करण्यात आली होती. खरीप हंगामातील पिकासाठी शेतकऱ्यांना २ टक्के विमा रक्कम भरावी लागते तर रब्बी हंगामासाठी १.५ टक्के रक्कम भरावी लागते. शेतपिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून २०१६ साली पंतप्रधान पीकविमा योजना सुरू करण्यात आली. मात्र आतापर्यंत पीक विम्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी विमा कंपन्याच हजारो कोटी रुपये नफा मिळवला.कंपन्यांनी शेतकऱ्यांची किरकोळ भरपाई देऊन बोळवण केल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे विमा कंपन्यांनी यातून दरवर्षी तब्बल ५ हजार कोटी रुपयांच्या घरात नफा कमावल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी पिकांना विमा ( Insurance )संरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि देशात २०६ साली पंतप्रधान पीकविमा योजना लागू केली.

वाचा: मुख्यमंत्रीचा मोठा निर्णय: परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचा आदेश..! जाणून घ्या महत्वाचे निकष

सात पीकविमा कंपन्यांना नोटीस जारी-

पीकविमा कंपन्या हजारो कोटी रुपयांचा नफा कमवत असतानाही शेतकऱ्यांना पीक विम्याची ( Insurance )भरपाई दिली जात नाही. त्यामुळे याप्रकरणी सांगोल्याचे शेतकरी गोरख घाडगे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने याप्रकरणी सात पीकविमा कंपन्यांना नोटीस बजावली असून त्या कंपन्यांनी अद्याप या नोटिशीला उत्तर दिलेले नाही.

मोदी सरकारची मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी केले तब्बल 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर, तरुणांसाठी सुवर्णसंधी…

नफेखोरीला आळा घालणे आवश्यक –

रिलायन्स इन्शुरन्स आणि भारतीय कृषी विमा या दोन कंपन्यांनी ( Insurance )सर्वाधिक नफा कमावला आहे. या नफेखोरीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावाही केला होता. मात्र यात कोणताही बदल झालेला नाही.

वाचा: सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर! केंद्राने काढले सोयाबीनवरील स्टॉक लिमिट; आता दरात होणार मोठी वाढ…

पिक विमा कंपन्यांनी आतापर्यंत दिली एवढी भरपाई –

२०१६-१७ या आर्थिक वर्षात ५ कोटी ८३ लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केल्यानं २१६९७ कोटी रुपयांची विमा रक्कम जमा झाली. नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना १६८०७ कोटी रुपये देण्यात आले.२०१७-१८ मध्ये ५ कोटी ३२ लाख लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली. विमा कंपन्यांकडे २४५९७ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली त्यापैकी त्या वर्षी शेतकऱ्यांना २२१४२ कोटी रुपये देण्यात आले.२०१८-१९ मध्ये ५ कोटी ८० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला. त्यामुळे विमा कंपन्यांकडे २९६९३ कोटी रुपये जमा झाले. त्यापैकी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या दाव्याचा परतावा म्हणून २८४६४ शेतकऱ्यांना देण्यात आले.२०१९-२० मध्ये पीक विमा योजनेत ( Insurance ) सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. ६ कोटी २४ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवल्यानं ३२३४० कोटी रुपये विमा कंपन्यांना मिळाले त्यापैकी परतावा म्हणून शेतकऱ्यांना २६४१३ कोटी रुपये देण्यात आले.२०२०-२१ या आर्थिक वर्षात ६ कोटी २३ हजार शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले. विमा कंपन्यांना यामुळं ३१८६१ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी शेतकऱ्यांचे १७९३१ कोटी रुपयांचे दावे मंजूर करण्यात आले.२०२१-२२ मध्ये पीक विमा योजनेत ( Insurance )सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या केवळ खरीप हंगामातील आहे. अनेक राज्य या योजनेतून बाहेर देखील पडली आहेत. ४ कोटी ९८ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला. पीक विमा रक्कम ( Insurance ) म्हणून १८९४४ कोटी रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा झाली. त्यापैकी शेतकऱ्यांच्या नुकसानाचा परतावा म्हणून ७५५७ कोटी रुपये देण्यात आले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button