ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Income Tax For Farmer | धक्का! आता श्रीमंत शेतकऱ्यांनाही कराच्या जाळ्यात, पण किती? सरकारचा ‘आयकर’ प्लान; वाचा सविस्तर वृत्त…

Income Tax For Farmer | Shock! Now the rich farmers are also in the tax net, but how much? Government's 'Income Tax' Plan; Read the detailed report…

Income Tax For Farmer | केंद्र सरकार देशातील श्रीमंत शेतकऱ्यांवर आयकर लावण्याचा विचार करत आहे. करप्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. (Income Tax For Farmer) याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) सदस्या आशिमा गोयल यांनी माहिती दिली आहे.

गोयल यांनी सांगितले की, सरकार गरीब शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या खात्यात पैसे पाठवत आहे. मात्र आता श्रीमंत शेतकऱ्यांवर आयकर लावून कर आकारणी रचनेत पारदर्शकता आणण्याचा विचार केला जात आहे.

देशातील श्रीमंत शेतकऱ्यांची संख्या जवळपास ३ टक्के आहे. एनएसएसओने केलेल्या २०२३ मधील सर्वेक्षणानुसार देशातील शेतकऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न हे ६४२६ रूपये आहे. त्यामुळे अधिक कमाई करणाऱ्या शेतकऱ्यांना आयकरच्या कक्षेत आणण्याचा विचार सरकार करत आहे.

वाचा : Agricultural Technology | शेतात रोबोटिक्सची क्रांती; कशी कापणी आणि शेतीचे स्वरूप बदलत आहे?

या निर्णयामुळे देशातील श्रीमंत शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारचा असा दावा आहे की, हा निर्णय कर आकारणी रचनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरील अचूक आकडेवारी गोळा करण्यासाठी घेण्यात येत आहे.

कमी कर दर आणि किमान सूट देण्याची शक्यता

गोयल यांनी सांगितले की, श्रीमंत शेतकऱ्यांसाठी कमी कर दर आणि किमान सूट देऊन हा कर लागू केला जाऊ शकतो. यामुळे श्रीमंत शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी होईल.

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात श्रीमंत शेतकऱ्यांवर आयकर लावण्याचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो.

Web Title | Income Tax For Farmer | Shock! Now the rich farmers are also in the tax net, but how much? Government’s ‘Income Tax’ Plan; Read the detailed report…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button