ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

ASER Survey | ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वाचन-गणिताला खो खो, दुसरीचं पुस्तक वाचणंही अवघड! ASER अहवालात धक्कादायक चित्र

ASER Survey | Rural students' reading-mathematics is bad, even reading the second book is difficult! Shocking picture in ASER report

ASER Survey | ग्रामीण भारतातील शैक्षणिक स्थितीचा आरसा दाखणारा ASER अहवाल पुन्हा एकदा चिंताजनक वास्तव समोर आणतोय. यावर्षीच्या सर्वेक्षणात धक्कादायक निष्कर्ष आला आहे – 14 ते 18 वयोगटातील ग्रामीण विद्यार्थ्यांपैकी चौपटं विद्यार्थी दुसरीचं पुस्तकही वाचू शकत नाहीत! (ASER Survey ) मूलभूत वाचन आणि गणित कौशल्येही त्यांच्याजवळ कमालीची कमकुवत असल्याचं चित्र दिसतंय.

अहवालानुसार, या वयोगटातील 25 टक्के विद्यार्थी आपल्या मातृभाषेत इयत्ता दुसरीचं पुस्तक अस्खलितपणे वाचू शकत नाहीत. तर सुमारे 47 टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीतील साधे वाक्य समजणंही अवघड जातंय. ग्रामीण मुलांच्या गणित कौशल्येही दयनीय अवस्थेत आहेत. यापैकी अर्ध्याहून अधिक विद्यार्थी तीन अंकी भागाकार सोडवू शकत नाहीत! इयत्ता तिसरी-चौथीत शिकवले जाणारे हे पायाभूत गणितही त्यांना अवघड जातंय. वेळ ठरवणे, मूलभूत गणना करणे अशा दैनंदिन गणितीय गरजाही त्यांना भागवत नाहीत, असं अहवालात म्हटलंय.

वाचा | Godam Yojna | गाव तिथे गोदाम योजना; शेतकऱ्यांना मिळणार साठवणुकीची सोय, जाणून घ्या योजनेविषयी सविस्तर

मुलींपेक्षा मुलांची कामगिरी अल्पशीण चांगली असल्याचंही लक्षात आलं. पण तेव्हाही परिस्थिती गंभीरच आहे. मुलांपैकी 45 टक्के विद्यार्थीच भागाकार करू शकतात, तर मुलींमध्ये हा आकडा फक्त 41.8 टक्के आहे. वेळेची गणना आधारित गणित सोडवण्यातही मुलांची कामगिरीच चांगली – 50.5 टक्के मुलं यशस्वी ठरली तर मुलींमध्ये हा आकडा 41.1 टक्के आहे.

या सर्वेक्षणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आला आहे – 14 ते 18 वयोगटातील केवळ 86.8 टक्के मुलं शैक्षणिक संस्थांमध्ये नोंदणीकृत आहेत. कोरोना महामारीनंतर मुलं शाळेपासून दुरावल्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

ASER सर्वेक्षण 26 राज्यांमधील 28 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये 34,745 विद्यार्थ्यांच्या सहभागितेने करण्यात आलं. प्रत्येक राज्यातून एक जिल्हा निवडून सर्वेक्षण करण्यात आलं. सर्वेक्षणाच्या निष्कर्षावर प्रतिक्रिया देताना, तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचं ते म्हणतात. शाळेचं वातावरण सुधारणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे आणि मुलांना शाळेत नियमित येण्यासाठी प्रोत्साहित करणे यावर सरकारने लक्ष केंद्रित करावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Web Title | ASER Survey | Rural students’ reading-mathematics is bad, even reading the second book is difficult! Shocking picture in ASER report

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button