ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

आयकर विभागाचा करदात्यांना मोठा दिलासा, हा घेतला निर्णय…

The decision of the Income Tax Department is a great relief to the taxpayers.

आयकर विभागाने (Income tax department) करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्या करदात्यांनी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये आयकर (income tax) विवरणपत्राचे आतापर्यंत ई-व्हेरिफिकेशन (E-verification) केले नाही, असे करदाते ही प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करू शकतात. आयकर विभागाच्या (Income tax department) या निर्णयामुळे अनेक करदात्यांना दिलासा मिळणार आहे.

वाचा –

नियमांनुसार, डिजीटल स्वाक्षरीशिवाय, इलेक्ट्रॉनिक्स (electronics) स्वरुपात आयकर विवरणपत्र दाखल करण्यावर त्याचा आधार ओटीपी, नेटबँकिंग, डिमॅट खात्याद्वारे पाठवण्यात आलेला कोड व्हेरिफाय (code verify) करावा लागतो. हे ई-व्हेरिफिकेशन (E-verification) आयकर दाखल केल्यानंतर 120 दिवसांमध्ये करावे लागते. त्याशिवाय करदाते बंगळुरूमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर (Central processing center) कार्यालयात आयटीआर कार्यालयात एक प्रत पाठवून व्हेरिफिकेशन (E-verification) करता येऊ शकते. ही व्हेरिफिकेशन (verification) प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही. तो पर्यंत आयकर विवरण दाखल केले नाही, असे म्हटले जाते.

वाचा –

28 डिसेंबरपर्यंत 4.86 कोटी ITR भरण्यात आले आहे. वर्ष 2021-22 साठी आयकर विवरण दाखल (File income tax returns) करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये एकूण 5.95 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. मागील वर्षी इतके आयटीआर दाखल होण्यासाठी अद्याप सुमारे 9 लाख अर्ज भरले जाणे अपेक्षित आहे. तीन दिवसांत आयटीआर (ITR) दाखल करण्याची शेवटची तारीख तीन दिवसात संपणार आहे.

ITR पोर्टलविरोधात असंतोष

आर्थिक वर्ष 2020-21 करीता आयकर विवरणपत्र दाखल (Income Tax Return filing)करण्यासाठी आता शेवटचे काही दिवस उरले आहेत. तर, दुसरीकडे आयकर खात्याच्या वेबपोर्टलविरोधात (webportal) असंतोष वाढत आहे. ITR दाखल करण्यासाठी शेवटची मुदत 31 डिसेंबर आहे. ही मुदत वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी सोशल मीडियावर #Extend_Due_Date_Immediately हा हॅशटॅग ट्रेंडही करण्यात आला. केंद्र सरकारने याआधी Income Tax Return दाखल करण्याची मुदत ही 31 जुलैहून 30 सप्टेंबर आणि त्यानंतर आता 31 डिसेंबर केली होती.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button