ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील तब्बल सोळा गावांनी पटकावला लाखो रुपयांचा पुरस्कार…

Central Government's National Panchayat Award announced, 16 villages in Maharashtra won lakhs of rupees ..!

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ग्रामीण विकास ( rural development) देखील महत्त्वाचा ठरतो त्यासाठी केंद्र सरकार विविध योजना व पुरस्कार( Award) देऊन ग्रामीण भागामध्ये प्रोत्साहन देत असते. असे पुरस्कार ज्या पंचायत (Panchayat) देशामध्ये उत्कृष्ट कामागिरी करत असते त्या पंचायत या पुरस्कार चे मानकरी होत असतात.

भारत सरकार सन 2011-12 पासून राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतींना प्रोत्साहित करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार दरवर्षी 24 एप्रिल ला राष्ट्रीय पंचायत राज दिवशी दिला जातो.
या पुरस्कारांमध्ये विविध श्रेणीनुसार ऑनलाइन निविदा मागवल्या जातात.

पुरस्कार श्रेणी खालीलप्रमाणे असतात.


दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण
नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्राम सभा पुरस्कार
ग्रामपंचायत विकास योजना पुरस्कार
बाल सुलभ ग्रामपंचायत पुरस्कार.

केंद्र सरकारकडून( Government of India) सन 2021 चे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने चांगले यश मिळवले आहे. यामध्ये एक जिल्हा परिषद, दोन पंचायत समित्या आणि सोळा ग्रामपंचायतींनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत यश मिळविले.

🙏 दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराचे मानकरी आणि रक्कम पुढील प्रमाणे:- सातारा जिल्हा परिषद(50 लाख रुपये), रहाता आणि गडिंग्लज या दोन पंचायत समिती( प्रत्येकी 25 लाख रुपये).

तसेच 14 ग्रामपंचायतींनी हा पुरस्कार पटकावला आहे. ( रक्कम लोकसंख्येनुसार पाच लाख ते 15 लाख )
मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा),
चंद्रपूर (ता. राहाता. जि. अहमदनगर),
लोहगाव (ता. राहाता. जि. अहमदनगर),
जाखोरी (ता. जि. नाशिक),

गोवरी (ता.मौदा, जि. नागपूर),नागोसली (ता. इगतपुरी, जि. नाशिक),
येनीकोनी (ता. नरखेड, जि. नागपूर),
मरोडा (ता. मूल, जि. चंद्रपूर),
तमनाकवाडा (ता. कागल, जि. कोल्हापूर),
लेहेगाव (ता. मोर्शी, जि. अमरावती), वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली),
देगांव (ता. वाई, जि. सातारा),
अंजनवेल (ता. गुहागर, जि. रत्नागिरी)
पीरगयबवाडी (ता. घनसावंगी, जि. जालना)
अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ( हसन Mishrif) यांनी दिली.

🙏नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार २०२१ ( रक्कम 10 लाख रुपये) हा राज्यातून मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा) या ग्रामपंचायतीने पटकावला.

🙏ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार २०२१( रक्कम पाच लाख रुपये) हा राज्यातून लोणी बुद्रुक (ता. राहाता, जि. अहमदनगर) या ग्रामपंचायतीने पटकावला.

🙏बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार २०२१ ( रक्कम पाच लाख रुपये) हा राज्यातून सिरेगाव (ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदीया) या ग्रामपंचायतीने पटकावला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button