ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Tomato Rates | टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ; कांद्याप्रमाणे टोमॅटोसाठी सुद्धा मिळणार अनुदान

Tomato Rates |राज्यात टोमॅटोचे दर पडले आहेत. या पार्श्वभूमीवर काल (ता.२०) नाशिक येथे आपला संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून आपला निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक माहिती दिली आहे. कांद्याप्रमाणे टोमॅटोला उत्पादकांना अनुदान देण्यासाठी शासन निर्णय घेईल असे दादा भुसे म्हणाले आहेत.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

शेतकऱ्यांना आर्थिक फटका

राज्यात मागील चार पाच दिवसांत टोमॅटोची आवक प्रचंड वाढली आहे. त्यातच उन्हाचा तडाखा आणि गुजरातमधील थंडावलेली निर्यात यामुळे टोमॅटोचे दर सरसर घसरले आहेत. याचाच परिणाम म्हणून उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आधीच अवकाळी पाऊस आणि आता पडलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालेले पहायला मिळत आहेत.

दादा भुसेंनी दिला शेतकऱ्यांना दिलासा

यापार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मागील महिनाभरतील नाशिक बाजार समितीमध्ये किती व कोणत्या दराने टोमॅटो विक्री झाली ? याचा स्वविस्तर अहवाल देण्याचे आदेश दादा भुसे यांनी प्रशासनाला दिले आहेत. हा अहवाल शासनाकडे सादर करून त्याबाबत लवकरच शेतकऱ्यांना चांगली बातमी देऊ असा शब्द दादा भुसे यांनी दिला आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

टोमॅटो अनुदान मिळण्याची शक्यता

काही महिन्यांपूर्वी राज्यात कांद्याचे देखील असेच दर घसरले होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. त्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत कांदा अनुदान जाहीर केले होते. दरम्यान आता टोमॅटो उत्पादकांसाठी सुदधा अशाप्रकारचे अनुदान जाहीर होऊ शकते. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Government will provide tomato subcidy to farmers

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button