ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
आरोग्य

Fennel seeds | बडीशेप आहे शरीरासाठी संजीवनी ; रोज सेवन केल्याने होतात ‘हे’ फायदे

Fennel seeds |अनेक लोकांना माउथ फ्रेशनर ( Mouth Freshner) म्हणून बडीशेप खायला आवडते. तसेच जेवण बनवताना काही पदार्थांमध्ये आवर्जून बडीशेप (Fennel) वापरतात. बडीशेप खाल्ल्याने वजन कमी होते असे बऱ्याचदा म्हंटले जाते. मात्र बडीशेप खाण्याचे इतर देखील भन्नाट आरोग्यदायी फायदे (Advantages) आहेत.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

१) बडीशेप खाल्ल्याने हाडे मजबूत होतात

बडीशेपमध्ये फॉस्फेट, कॅल्शियम, लोह, झिंक, मॅंगनीज आणि व्हिटॅमिन ‘के’ ही जीवनसत्त्वे व खनिजे आढळतात. यामुळे हाडांची रचना आणि ताकद वाढवण्यासाठी मदत होते. महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे हाडांच्या फ्रॅक्चरचा (Bone Fracture) धोका कमी होतो.

२) हृदयाच्या आरोग्यासाठी बडीशेप फायदेशीर असते

बडीशेप मध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात. यामुळे रक्तातील एकूण सीरम कोलेस्टेरॉल आणि लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. याचा परिणाम म्हणून हृदयविकाराचा (Heart Problems) धोका कमी होतो.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

३) रक्तदाब कमी करण्यास मदत होते

बडीशेपमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे घटक असतात. हे घटक अगदी नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करू शकतात. तसेच बडीशेपमध्ये असणारे नायट्रेट्स वासोडिलेटरी आणि व्हॅसोप्रोटेक्टिव्ह गुणधर्मांनी समृद्ध असतात. यामुळे रकदाब (Blood Pressure) कमी करण्यासाठी मदत होते.

बऱ्याच लोकांना बडीशेप कशी खावी किंवा तिचे सेवन कसे करावे हा प्रश्न पडलेला असतो. आहारात बडीशेप समाविष्ट करण्यासाठी तुम्ही बडीशेपचे पाणी पिऊ शकता. बडीशेपचे वाटण पदार्थांमध्ये वापरू शकता. तसेच बडीशेप चहा देखील शरीरासाठी आरोग्यदायी असतो.

Advantages of eating fennel seeds

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button