ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Sanchar Sathi Portal | दिलासादायक ! आता मोबाईल चोरीला बसणार आळा ; केंद्र सरकारने सुरू केला हा नवीन फंडा …

Sanchar Sathi Portal |सध्याच्या ऑनलाइन जगात ( Online World) अपडेटेड रहायचे असेल तर मोबाईल शिवाय पर्याय नाही. यामुळेच मोबाईल ही सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट ठरली आहे. दरम्यान बऱ्याचदा आपला मोबाईल चोरीला जातो. यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. तसेच मोबाईल मध्ये असणाऱ्या वैयक्तिक माहितीचा चुकीचा वापर होण्याची देखील शक्यता असते. मात्र आता ही चिंता राहणार नाही. यावर उपाय म्हणून थेट केंद्र सरकारने एक नवीन यंत्रणा आणली आहे.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

संचार साथी पोर्टल

केंद्र सरकारने दूरसंचार क्षेत्राशी संबंधित एक नवीन पोर्टल नुकतेच लाँच केले आहे. संचार साथी पोर्टल (Sanchar Saathi Portal) असे हा पोर्टलचे नाव आहे. दूरसंचार क्षेत्रातील पारदर्शकता, सुरक्षा आणि जबाबदारी वाढवणे हा संचार साथी या पोर्टलचा मुख्य हेतू आहे. या पोर्टलमुळे मोबाईल संबंधित अनेक अडचणी झटक्यात सुटणार आहेत.

संचार साथी पोर्टलचे फायदे

१) हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल फोन वेळीच ब्लॉक करणे व मोबाईल फोन तात्काळ ट्रॅक करणे.
२) आपल्या मोबाईलचे कनेक्शन चेक करणे. यालाच नो युअर मोबाईल (KYM) म्हणतात. हे पोर्टल मोबाईल वापरकर्त्यांना त्यांचा मोबाईल नंबर वापरुन लॉग इन करण्यास मदत करते आणि त्यांच्या मोबाईचे कनेक्शन चेक केले जाऊ शकते. या माध्यमातून तुम्ही कोणतेही अनधिकृत किंवा चुकीचे कनेक्शन ब्लॉक करु शकता.
३) या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या सिमची ग्राहक पडताळणी होईल. यासाठी पोर्टलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अँड फेशियल रिकग्निशनचा (ASTR) वापर करण्यात आला आहे

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

पोर्टलचा मुख्य हेतु

भारताचे केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच संचार साथी पोर्टलची सुरुवात केली आहे. मोबाईल कनेक्शन आणि टेलिकम्युनिकेशन संबंधित विविध सुधारणा करणे हा या पोर्टलचा मुख्य हेतु असणार आहे. तुम्हाला या सेवेचा वापर करायचा असेल तर, https://sancharsaathi.gov.in लिंकवर जा.

फसवणुकीला बसेल आळा

केंद्र सरकारने सुरू केलेल्या या पोर्टलमुळे मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अँड फेशियल रिकग्निशनच्या (ASTR) माध्यमातून आता ग्राहकांची फसवणूक टळणार आहे.

Government launched sanchar sathi portal

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button