ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Fertilizers Rates | खुशखबर ! खतांच्या किंमतीत कसलीही वाढ होणार नाही ; सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizers Rates | राज्यातील शेतकरी सततच्या येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे हतबल झाले आहेत. अवकाळी पाऊसांमुळे (unseasonal rain ) पिकांचे झालेले नुकसान आणि त्यातून वाचलेल्या पिकांना न मिळालेला भाव यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशातच शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या किंमतीत वाढ ( Hike in fertilizers rate) केली जाईल. अशा चर्चा मागील काही दिवसांत सुरू होत्या. यामुळे शेतकरी अधिक चिंतेत अडकले होते.

वाचा विक्रमी सुवर्ण! सोन्याने गाठला उच्चांक, चांदीच्या दरातही वाढ, असे आहेत आजचे दर

खतांच्या किंमतीत वाढ होणार नाही

दरम्यान आता केंद्रसरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. खताच्या किंमतीत सरकारकडून कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच यंदाच्या खरीप हंगामासाठी सरकारने सुमारे १.८ लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाला मंजुरी दिली आहे. या हंगामात केंद्र सरकार युरियासाठी ७० हजार कोटी रुपये ( Uria) आणि डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) साठी ३८ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

म्हणून खतांच्या किंमतीत वाढ नाही

आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत खतांच्या किमतीत तफावत दिसत आहे. असे असताना देशातील शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळावे व शेतकऱ्यांना खताचा आर्थिक बोजा सहन करायला लागू नये. यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. मागील वर्षी सरकारच्या अर्थसंकल्पात खत अनुदानासाठी एकूण २.५६ लाख कोटी रुपये खर्च केले होते. अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

वाचाखुशखबर! सरकारचा शेतकरी हिताचा मोठ्ठा निर्णय, ‘इतके’ दिवस पाऊस पडल्यास समजली जाणार नैसर्गिक आपत्ती; शेतकऱ्यांना होणार फायदा

शेतकऱ्यांना होणार फायदा

सध्याची शेतकऱ्यांची अवस्था पाहता खतांच्या किंमतीमध्ये न होणारी वाढ, ही शेतकऱ्यांसाठी प्रचंड दिलासादायक असणार आहे. तसेच सरकारने यंदा नॅनो युरिया व नॅनो डीएपी उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना आणखी फायदा होत आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.

Government declared update about fertilizers rate

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button