ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Pakistan PM | धक्कादायक ! इम्रान खान यांच्या घरात ३०-४० दहशतवादी आश्रयाला ; पोलिसांनी दिला २४ तासांचा अल्टीमेटम

Pakistan PM|पाकिस्तानात दहशतवाद काही नवीन नसला तरी, सध्या पाकिस्तान मधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घरात ३० ते ४० दहशतवाद्यांनी आश्रय घेतल्याचे उघड झाले आहे. यामुळे इम्रान खान यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे म्हंटले जात आहे.

पंजाब सरकारने उचलली ठोस पाऊले

इम्रान खान यांचे अपहरण आणि त्यांची बेकायदेशीर अटक यावरून इम्रान खान यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. मागील आठवडाभरात देशात राजकीय अस्थिरता पसरली असून या घटनेने आणखी गोंधळ उडवून दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने ठोस पाऊले उचलली आहेत.

वाचा: दिलासादायक ! आता मोबाईल चोरीला बसणार आळा ; केंद्र सरकारने सुरू केला हा नवीन फंडा …

दहशतवाद्यांना ताब्यात देण्यासाठी २४ तासांचा अल्टीमेटम

इम्रान खान यांच्या लाहोरमधील जमान पार्क येथील घराभोवती पंजाब प्रांत सरकारने पाठवलेल्या पोलिसांनी वेढा घातला आहे. या दहशतवाद्यांना ताब्यात देण्यासाठी सरकारने २४ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. ” पीटीआयने या दहशतवाद्यांना सोपवावे अन्यथा कायदा आपले काम करेल ” असे पंजाब प्रांताचे मंत्री अमीर मीर म्हणाले आहेत.

आर्मी इन्स्टिट्यूटवरील हल्ला सुनियोजित

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ आता दहशतवाद्यांप्रमाणे वागत आहे. मागील एक वर्षातून अधिक काळ पीटीआय प्रमुख इम्रान खान लष्कराला लक्ष्य करत आहेत. इम्रान खान यांच्या अटकेपूर्वी हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. ९ मे रोजी आर्मी इन्स्टिट्यूटवर झालेला हल्ला सुनियोजित आल्याचे अमीर मीर यांनी सांगितले आहे.

शून्य सहनशीलतेचे धोरण

या पार्श्वभूमीवर पंजाब प्रांत सरकारने आता शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. याठिकाणी पोलिसांना गुन्हेगारांवर कारवाई करण्यास फ्रीहँड ( Free Hand) दिला आहे. यामुळे इम्रान खान ( Imran Khan) मोठ्या अडचणीत सापडले आहेत हे मात्र नक्की !

लष्करी न्यायाल देणार शिक्षा

दरम्यान जिना हाऊसवरील हल्ल्याशी संबंधित बोलताना अमीर मीर म्हणाले की, जिना हाऊसवरील हल्ला सहज रोखता आला असता. मात्र, याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना शस्त्र वापरण्यापासून रोखले होते. जेणेकरून रक्तपात थांबवता येईल. महत्त्वाची बाब म्हणजे इथून पुढे लष्करी कार्यालयांवर हल्ला करणाऱ्यांवर लष्करी न्यायालयात खटला चालवला जाणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Thirty to fourty terrorists are in imran khan’s home

Imran khan, Pakistan, terrorism

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button