lang="en-US"> Health Tips | उन्हाळ्यात जास्त घाम येण्यामागे असू शकतात 'ही' पाच कारणे

Health Tips | उन्हाळ्यात जास्त घाम येण्यामागे असू शकतात ‘ही’ पाच कारणे

Health Tips |उन्हाळ्यात (Summer) तापमानाची तीव्रता जास्त असते. यामुळे लोकांना गर्मीचा त्रास होतो. मात्र काही लोक असे असतात ज्यांना गर्मीचा त्रास जास्त होतो आणि प्रचंड घाम येतो. आज जाणून घेऊयात जास्त घाम येण्याची कारणे

१) ताण-तणाव : ताण-तणावामुळे (Stress) अनेक शारीरिक व्याधी जाणवतात. हायपोथालेमस हा आपल्या मेंदूचा एक भाग आहे. हा भाग शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतो. जेव्हा शरीरावर ताण येतो तेव्हा हायपोथालेमस शरीराला उच्च तापमानात रीसेट करतो. जेव्हा शरीर तणावाखाली असत. तेव्हा त्यातून प्रतिसाद निर्माण होतो, ज्यामुळे धड आणि डोक्यात रक्त जमा होऊ शकते. या परिस्थितीत तुम्हाला उबदार वाटते आणि घाम येतो.

वाचा:  अरेरे ! दुधाच्या दरात कपात सुरूच ; दुग्ध उत्पादक चिंतेत …

२) हायपरथायरॉईडीझम : हायपरथायरॉईडीझम मध्ये थायरॉईड ग्रंथी शरीरामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त थायरॉईड संप्रेरक तयार करण्यास सुरवात करते. सामान्यतः हायपोथालेमस थायरॉईड ग्रंथीला सिग्नल पाठवते ज्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी आवश्यक हार्मोन्स तयार होतात. या प्रक्रियेत ज्यावेळी थायरॉईड ग्रंथी अधिक सक्रिय होते त्यावेळी जास्त प्रमाणात घाम येतो.

३) एनहायड्रोसिस : एनहायड्रोसिस या स्थितीमध्ये एखाद्या प्रभावित व्यक्तीला जास्त गरम वाटते. परंतु येत नाही. या स्थितीमध्ये शरीर घाम सोडू शकत नसल्याने जास्त गरम वाटू लागते. कारण घाम येणे शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करते. यावेळी स्नायूंमध्ये पेटके, चक्कर येणे अशाही समस्या जाणवतात.

वाचा: वाढत्या उन्हाचा पोल्ट्री व्यवसायिकांना फटका ! कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले

४) रजोनिवृत्ती : जेव्हा एखादी स्त्री रजोनिवृत्तीपर्यंत (Monopause) पोहोचते तेव्हा तिच्या अंडाशयातून अंडी सोडणे बंद होते, ज्यामुळे ती गर्भधारणा करू शकत नाही. रजोनिवृत्ती दरम्यान स्त्रीला गर्मी होण्याचा त्रास जाणवतो. हा त्रास ४५ ते ५५ वयातील महिलांना होतो.

५) अन्न आणि पेये : मसालेदार पदार्थ, कॅफीन आणि अगदी अल्कोहोल यासारखे खाद्यपदार्थ आणि पेये तुमच्या शरीराचे तापमान वाढवू शकतात. ते पदार्थ तुमची हृदय गती वाढवतात, ज्यामुळे तुम्हाला फ्लश, गर्मी होते आणि घाम येतो.

Five reasons behind sweating in summer

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Exit mobile version