lang="en-US"> Mobile Cancer | बाप रे! झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवता का? वेळीच व्हा सावध अन्यथा होईल कॅन्सर

Mobile Cancer | बाप रे! झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवता का? वेळीच व्हा सावध अन्यथा होईल कॅन्सर

Mobile Cancer | आजच्या जगात मोबाईल हे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, प्रत्येकजण मोबाईलचा (Mobile Cancer) वापर करतो. मात्र, मोबाईलचा अत्यधिक वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. विशेषतः, रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवण्याची सवय अनेकांना आहे. ही सवय अनेक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते.

मोबाईल रेडिएशन आणि त्याचे दुष्परिणाम:
मोबाईल फोन रेडिओ फ्रिक्वेंसी (RF) सोडतात. या रेडिएशनमुळे डोळ्यांवर ताण, डोकेदुखी, थकवा, आणि झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच, दीर्घकाळासाठी मोबाईल रेडिएशनच्या संपर्कात राहिल्याने कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो.

वाचा| एक कोटी कुटुंबांना महिन्याला मिळणार वीज मोफत, ‘पंतप्रधान सूर्य घर योजना’ जाणून लगेच करा अर्ज

मोबाईल आणि झोपेचा संबंध:
मोबाईल स्क्रीनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे शरीरात मेलाटोनिन नावाच्या हार्मोनचे उत्पादन कमी होते. मेलाटोनिन हे झोपेसाठी आवश्यक असलेले हार्मोन आहे. त्यामुळे, रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्याने झोपेची गुणवत्ता कमी होते आणि अनिद्रा, थकवा, आणि चिडचिडेपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

वाचा

Exit mobile version