Fertilizer adulteration | जैविक व सेंद्रिय खतांमध्ये रासायनिक खतांची भेसळ; चार नामांकित कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; पहा कोणत्या कंपनी कोणत्या
Fertilizer adulteration Adulteration of chemical fertilizers in biological and organic fertilizers; Fraud case against four reputed companies; See which company is which
Fertilizer adulteration | नाशिक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या माध्यमातून पारोळा (जि. जळगाव) आणि नंदुरबार येथे जैविक व सेंद्रिय खतांमध्ये रासायनिक खतांची भेसळ(Fertilizer adulteration) करून त्यांची विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत चार कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत ३६ टन जैविक व सेंद्रिय खत जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत सुमारे ८ लाख ७० हजार रुपये आहे.
खत चाचणी प्रयोगशाळेने या खतांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि जिप्सम सारख्या दुय्यम व निकृष्ट दर्जाच्या खतांचे भेसळ असल्याचे निष्पन्न झाले. ही रासायनिक खते मोठ्या प्रमाणावर या जैविक व सेंद्रिय खतांमध्ये आढळून आली.
जप्त करण्यात आलेल्या खतांमध्ये सुप्रीम कामधेनु फर्टिलायझर (वडोदरा), रामिकर ॲग्रो इंडस्ट्री (सुरत), किसान भारती फर्टिलायझर सचिन (सुरत) आणि बायोफॅक इनपुट प्रायव्हेट लिमिटेड (हैदराबाद) या चार कंपन्यांची उत्पादने आहेत.
वाचा : Crop Insurance | अर्रर्र..! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्यासाठी पहावी लागणार वाट; तब्बल ८४९ कोटींचा अग्रीम थकीत
या चार कंपन्यांवर पारोळा आणि नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवाईबाबत नाशिक विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या सेंद्रिय, जैविक खते संशयास्पद वाटल्यास नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांची संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अशी खते खरेदी करण्यापूर्वी कृषी अधिकाऱ्यांची संपर्क साधून त्यांचा सल्ला घ्यावा आणि काही अनुचित प्रकार वाटल्यास ९८२२४४६६५५ या व्हॉट्सअप नंबरवर कळविण्यात यावा.
या कारवाईमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फसवणूक होण्यापासून रोखले जाईल आणि त्यांना दर्जेदार खते मिळतील, अशी अपेक्षा आहे.
Web Title : Fertilizer adulteration Adulteration of chemical fertilizers in biological and organic fertilizers; Fraud case against four reputed companies; See which company is which