ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्याकृषी सल्ला

Organic Fertilizers | शेतकऱ्यांनो रसायनिक खतांमध्ये वाढ झाल्याने ‘अशा’ पद्धतीने करा सेंद्रिय खतांचा वापर, जाणून घ्या फायदे

आजच्या परिस्थितीत कधी कोणत्या वस्तूचे दर वाढतील हे सांगताच येत नाही. त्याचप्रमाणे शेतमालाचे देखील असेच आहे.

Organic Fertilizers | खते (Fertilizer) आणि बियाणे (Seeds) यांच्या दरात देखील सतत चढ-उतार झालेला पाहायला मिळतोय. सध्या खरीप हंगाम (Kharif season) सुरू आहे. याचमुळे शेतकरी खते आणि बियाण्याची मोठ्या प्रमाणात खरेदी (Buy fertilizer seeds) करत आहेत. तर काही शेतकऱ्यांची खरेदी अद्याप झालेली नाही. कोणताही हंगाम (Season) सुरू व्हायचं म्हटलं की, खतांच्या आणि बियाणांच्या दरातील वाढ ही ठरलेलीच असते. त्याचप्रमाणे आता खरिपाची पेरणीला (Kharif season sowing) सुरुवात होताच रासायनिक खतांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा सेंद्रिय खतांकडे (Organic Fertilizers) वळले आहेत. चला तर मग सेंद्रिय खतांच्या फायद्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रासायनिक खतात दरवाढ
खरीप हंगामाला सुरुवात झाली असून, त्याचबरोबर आता पाऊस देखील काही प्रमाणात पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता जोमात पेरणीची सुरुवात केली जात आहेत. मात्र अशातच आता शेतकऱ्यांना बियाणे आणि खते वाढीच्या दरामुळे जोरदार आर्थिक फटका मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीतील बी बियाण्यांचे व खताचे बजेट ढासळणार आहे. त्याचबरोबर सर्वाधिक दरवाढ ही डीएपी खतात झाली आहे. शेतकरी पीक उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करतात. मात्र आता या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना खतांसाठी अधिकची रक्कम मोजावी लागेल.

वाचा: Vermicompost | काय सांगता? आता उसाच्या पाचोळ्यापासून होणार गांडूळ खत निर्मिती, कशी ती वाचा सविस्तर

सेंद्रिय शेतीचा फायदा काय?
• सेंद्रिय शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्च होतो.
• सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध, मशागत, शेण-गोमूत्राचा वापर करण्यास कोणताही खर्च करावा लागत नाही.
• बैलांच्या मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते.
• यासह शेणखत किंवा गांडूळखत वापर केला तर शेतकऱ्यांचा अधिक फायदा होतो.
• रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यांन शेतातच सेंद्रिय पद्धतीने खतं निर्मिती करावी.

वाचा: Incentive Subsidy | अटी-शर्तींमुळे प्रोत्साहन अनुदानापासून 90 टक्के शेतकरी वंचित, वाचा काय ‘या’ आहेत अटी?

सेंद्रिय खतांमध्ये महत्वाची खते कोणती?
सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हणजे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माश्यांचे खत, खाटिकखान्याचे खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड ही आहेत. या खतांपासून शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतात. ही खते दीड ते दोन महिन्यांत तयार होतात. गांडूळ खतात गांडुळांसह अडीच ते तीन टक्के नायट्रोजन, 1.5 ते 2 टक्के सल्फर आणि 1.5 ते 2 टक्के पोटॅश असते. हे घरी किंवा शेतात तयार केले जाऊ शकते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना या खतांसाठी जास्तीचा खर्च देखील करावा लागणार नाही. त्याचबरोबर शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेतीतील उत्पादन घेऊ शकतील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button