ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Electricity Price Hike | विद्युत नियामक आयोगाने महावितरणला दिली वीज दरवाढीची परवानगी, ग्राहकांना 10 ते 70 पैसे प्रतियुनिट जास्त मोजावे लागणार

Electricity Price Hike | Electricity Regulatory Commission gives permission to Mahavitraan to hike electricity rates, consumers will have to pay 10 to 70 paise more per unit

Electricity Price Hike | महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणला अतिरिक्त उत्पादन खर्चाच्या 385.99 कोटी ग्राहकांकडून वसूल करण्याची परवानगी दिली आहे. (Electricity Price Hike) यामुळे इंधन संयोजन शुल्काच्या नावाखाली श्रेनिहाय ग्राहकांना 10 पैसे ते 70 पैसे प्रतियुनिट अधिकचे मोजावे लागणार आहेत. हे इंधन संयोजन शुल्क ग्राहकांना पुढील 10 महिने द्यावे लागणार आहे.

सध्या महावितरणने ग्राहकांसाठी पंचवार्षिक योजने अंतर्गत पाच वर्षाचे विजेचे दर आधीच निश्चित केले आहेत. मात्र होणार अतिरिक्त खर्च हा इंधन संयोजन दराच्या नावाने वसूल केला जातो. यावेळेस ही दरवाढ बीपीएल व कृषी ग्राहकांना देखील भरावी लागणार आहे. विजेच्या वापराच्या श्रेणी नुसार बीपीएल ग्राहकांना 10 पैसे प्रति युनिट, 1 ते 100 युनिट वापर असलेल्या ग्राहकांना 25 पैसे प्रति युनिट, 100 ते 300 युनिट वापरणाऱ्या ग्राहकांना 45 पैसे प्रति युनिट व 300 पेक्षा जात युनिटचा वापर करणाऱ्या ग्राहकांना 65 पैसे प्रति युनिट इंधन समायोजन शुल्क मोजावे लागणार आहे.

वाचा : Crop Loan Recovery | दुष्काळात नवी आशा! पीक कर्ज वसुली स्थगित, शेतकऱ्यांना 31 मार्च 2024 पर्यंत ‘मुबलक’ वेळ

महावितरण 2019 पासून आतापर्यंत वीज खरेदीला नियंत्रणात ठेवू शकले नाही. कंपनीने यावर 26483 कोटी रूपये अतिरिक्त खर्च केले आहेत. कोविड काळ सोडाला तर वर्ष 2019-20 ला 5 हजार 977 कोटी, वर्ष 2021-22 ला 10 हजार 541 कोटी व वर्ष 2022-23 ला 11 हजार 524 अतिरिक्त खर्च झाला आहे. चालू हंगामाचा अतिरिक्त खर्च 386.99 कोटी झाला आहे.

या अतिरिक्त खर्चासाठी महावितरण कडून आयाती कोळशाच्या वाढलेल्या किमती व त्यामुळे खुल्या बाजारात वाढलेले विजेचे दर व इतर खर्च करणीभूत असल्याचे महावितरण कडून सांगितले जात आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, ही तूट ग्राहक किंवा सरकार कडूनच भरून काढली जाऊ शकते. विद्युत नियामक आयोगाने ग्राहकांकडून हा अतिरिक्त खर्च करायला परवानगी दिल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.

या वीज दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. विशेषतः मध्यमवर्गीय व गरीब ग्राहकांना याचा जास्त फटका बसणार आहे. या वीज दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेच्या खर्चात वाढ होणार आहे.

Web Title : Electricity Price Hike | Electricity Regulatory Commission gives permission to Mahavitraan to hike electricity rates, consumers will have to pay 10 to 70 paise more per unit

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button