Ration Shops Closed | नवे वर्ष सुरू होण्याआधीच शॉक! १ जानेवारीपासून रेशन दुकाने बंद, गरिबांच्या थालीवर कोपरा!
Ration Shops Closed | Shock before the start of the new year! Ration shops closed from January 1, corner on the plate of the poor!
Ration Shops Closed | नववर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागलेल्या सर्वसामान्यांना आता धान्यसाठी दुकान कधी उघणार याकडे लक्ष देण्याची वेळ येणार आहे. कारण, १ जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदार (Ration Shops Closed) संपावर जाणार आहेत. या संपामुळे गरीबांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
रेशन दुकानदारांच्या संघटनेने याबाबत पत्रक काढले आहे. यात, ‘ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली, या देशपातळीवरील संघटनेने नव्या वर्षातील १ जानेवारी पासून देशव्यापी संप पुकारला आहे. या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सर्वांनी सहभागी घ्यावा’, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, ‘आपली रेशन दुकाने बंद ठेवावीत. आपापल्या दुकानातील ई-पॉस मशीन बंद ठेवावीत. कोणत्याही प्रकारे धान्याची उचल व वितरण देखील करू नयेत’, असे देखील काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
राज्यभरात सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार असून विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या मागण्यांमध्ये,
- रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार रुपये करा.
- मार्जिन मनी ३०० रुपये करा.
- टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या.
- आनंदाचा शिधा कायमस्वरुपी राबवून कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा.
वाचा | Banana Export | धमाका! केळी करणार कोटींची कमाई, शेतकऱ्यांच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस!
या मागण्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याची टीका देखील या पत्रकात करण्यात आली आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात फक्त पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अश्वासन देण्यात आली. मात्र ठोस निर्णय घेतला जा नाही. त्यामुळे नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनकडून हा संप पुकारण्यात आला आहे.
या संपामुळे गरीबांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण, रेशन दुकानदारांमधूनच गरीबांना मोफत किंवा कमी किमतीत धान्य मिळते. या संपामुळे गरीबांना धान्य खरेदीसाठी बाजारात जावे लागेल. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती आणखी बिकट होऊ शकते.
सरकारने रेशन दुकानदारांच्या मागण्यांवर तात्काळ विचार करून त्या पूर्ण कराव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Web Title | Ration Shops Closed | Shock before the start of the new year! Ration shops closed from January 1, corner on the plate of the poor!
हेही वाचा