डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने मार्फत ठिबक सिंचनाला मिळणार 90 टक्के अनुदान…
Dr. 90% subsidy for drip irrigation through Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana
शेताचे उत्पन्न वाढवायचे (To increase farm income) असेल तर पाणी (Water) हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. यामुळे शेतात विहिर असल्यास शेतकऱ्यांचा (Of farmers) उत्पन्नाचा मार्ग सुकर होत असतो. पण पुरेसा पैसा जवळ नसल्याने प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतात विहिर खोदणे शक्य नसते. अशाच गरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार धावून आले आहे. या योजनेच्या साहाय्याने सरकार आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे.
अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे, यासाठी राज्य शासन विविध योजना आखत असते. राज्यातील बळीराजांसाठी महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) एक योजना सुरू केली आहे. यामुळे राज्यातील अनुसूचित आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकरी सुखी समाधानी व्हावा, यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणली आहे.(. Babasaheb Ambedkar has brought Krishi Swavalamban Yojana) 2021-22 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या अंमलबजावणीस प्रशासकिय मान्यता मिळाली आहे.
‘स्वामित्व योजनेसंदर्भात’ सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय! वाचा तुम्हाला ‘या’ योजनेचा फायदा कसा होणार?
आवश्यक अटी/पात्रता
लाभार्थी हा अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे. शेतकऱ्याकडे त्याच्या स्वत:च्या नावे नवीन विहिरी साठी किमान 0.40 हेक्टर, इतर योजना 0.20 व कमाल 6.00 हेक्टर शेतजमीन असली पाहिजे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते (Bank account) असणे, ते बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
- दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यास (To the beneficiary) प्रथम प्राधान्य. दारिद्र्यरेषेखालील नसलेले अनुसूचित जाती, वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तेच लाभार्थी लाभ घेण्यास पात्र राहतील.
- दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) यादीत अंतर्भूत शेतकऱ्यांसाठी वार्षिक उत्पनाच्या मर्यादेची अट राहणार नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कृषी विभागाच्या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकता. https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :