अमरावती : सतत पडणारा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे (Due to continuous rain and cloudy weather) सोयाबीन पिकावर संकट पडले आहे, अशा वातावरणाचा सोयाबीनवर खोडमाशी (Scabies) चक्रीभुंग्याचा (Cyclone) यांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे तरी शेतकऱ्यांनी गाफील न राहता त्यावर उपाय योजना (Measure plan) कराव्यात. असे आवाहन कृषी विभागामार्फत (Through the Department of Agriculture) केले जात आहे.
सोयाबीनची पेरणी होऊन अवघे 20 ते 25 दिवस उलटले आहेत, परंतु सोयाबीनवर आता चक्रीभुंगा व खोडमाशीच्या संकटाचे सावट आहे तरीच वेळीच उपाययोजना करणे अनिवार्य आहे, अन्यथा या किडीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होऊ शकते, पिकांच्या उपयोजने संबंधित माहिती घेणे करिता, तालुके नजीकच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. त्या संबंधित मार्गदर्शन घ्यावे असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
जाणून घ्या, कसे कराल सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्याचे किड व्यवस्थापन…
खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या उपाय योजना कराव्यात (Measure plan)
खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत दिसत असल्या मुळे पाहिल्या 10 ते 15 दिवसात उपाय योजना करावी लागते. सुरुवातीला फोरेट (10 टक्के दाणेदार) 15 किलो प्रतिहेक्टर जमिनीत मिसळून द्यावे. सोयाबीन पेरणीनंतर प्रथम आंतर प्रवाही कीटकनाशक अर्थात थायमिथोक्झान 12.6 टक्के अधिक लाम्ब्डा सायहलोथ्रीन 9.5 टक्के यांची फवारणी घ्यावी. तसेच दूसरी फवारणी क्लोरानद्रनिप्रोल 18.5 टक्के मिली 10 लिटर पाण्यात किंवा इंडोक्साकार्य 15.8 टक्के ईसी हे 6.7 मिलि याप्रमाणे करावी.
शेतीसोबत ‘हा’ जोड धंदा करा, काही दिवसात व्हाल लखोपती!
चक्रीभुंगा किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाय (Measures to prevent the outbreak of cyclone insects)
निंबोळी अर्काची फवारणी (Spray of neem extract) केल्यास उत्तम ठरेल. तसेच पेरणी केल्यावर तीस-पस्तीस दिवसानंतर प्रादुर्भाव आढळल्यास, दहा दिवसाच्या आत मध्ये ट्रायझोफॉस ४० ई. सी. १६ मिली प्रति १० लिटर पाणी अथवा थायक्लोप्रीड २१.७ एस. सी. १५ मिली प्रति १० लिटर अथवा क्लोरांट्रनिलीप्रोल १८.५ एस. सी. ३ मिली मिली प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के आधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेड. सी २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. त्यामुळे चक्रीभुंगा कीडीवर नियंत्रण मिळेल.
अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा, वेळीच यांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यास सोयाबीनचे किडीपासून संरक्षित करू शकतो.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :