ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

गाईपासून मिळणारे “पंचगव्य” चे महत्व तुम्हाला माहीत आहे का?

Do you know the importance of "Panchagavya" from cow?

गाईपासून मिळणारे दूध शेण तसेच गोमूत्र हे आरोग्यवर्धक आहे,त्यामुळे जास्त मागणी असलेली पाहायला मिळते .दिल्ली येथील, “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” ला भारतातील नामवंत संशोधन संस्थांच्या वतीने अनेक प्रपोजल आली असून यामध्ये पंचगव्य म्हणजे गोमूत्र, शेन, दूध, तूप आणि दही या गाईपासून मिळणाऱ्या पाच वस्तूंचे फायदे आणि उपयुक्तता यावर अधिक संशोधन करण्याची प्रस्ताव मिळालेले आहेत.

हेही वाचा: आणखीन दोन दिवस बरसणार अवकाळी पावसाच्या सरी, कोणत्या जिल्ह्यात होणार पावसाचे आगमन सविस्तर बातमी.

🐄गोमुत्राचे फायदे:

१)गोमूत्राचे औषधी उपयोग सर्वांना माहीत असून, अनेक औषधांमध्ये ते आढळून येतात. गोमूत्र हे वेदनाशामक असून,रोगानूनाशक आहे.

२)गोमुत्राचे सेवन हे शरीरातील एखाद्या औषधासारखे काम करीत असून,मधाच्या जोडीने घेतलेल्या इतर औषधांची क्षमताही वाढते.

३)कर्करोग यासारख्या आजारातदेखील गोमूत्र लाभदायक ठरत असल्याचे म्हटले आहे. गोमूत्र रक्तशुद्धीकरण आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणारे आणि स्नायू व झाडांना पोषण देणारे आहे.

हेही वाचाखाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा डाऊनलोड करा, “मी E शेतकरी अँप” आणि आजच स्मार्ट शेतकरी.

🐄शेणाचे फायदे:

१) गाईचे शेणमध्ये,गंधक,सोडियम, मॅंगेनिज, झिंक,फॉस्फरस व नायट्रोजन यासारख्या तत्त्वांनी परिपूर्ण असून,हे केवळ खत म्हणून नव्हे औषध म्हणूनही वापरले जाते.

२)अचानक भाजले तर शेनाचा लेप लावल्यामुळे ते वेदनाशामक ठरतो. गाईच्या शेणाचा लेप अनेक त्वचारोगावर ही उपयुक्त आहे.

३)गाईच्या शेणाच्या गोवऱ्या जाळून त्याचा धूर केल्याने डासांचा आणि जंतांचा नायनाट होतो.

हेही वाचाखाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा डाऊनलोड करा, “मी E शेतकरी अँप” आणि आजच स्मार्ट शेतकरी.

🐄गाईच्या दुधाचे फायदे:

१) गाईचे दूध दही आणि तूप आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असून त्यांचे औषधी गुणही सर्वांना माहीत आहेत.

२)गाईचे दूध पचायला हलके आणि पौष्टिक असते. गाईच्या दुधामध्ये भिजवलेले कापसाच्या पातळ पट्टा डोळ्यावर ठेवल्याने आराम मिळतो.

३)दुधापासून दही ताक,तूप, अशा गोष्टी बनवले जातात. दूध आणि दही हे दररोजच्या जेवणामध्ये वापरल्याने पोटाचे विकार कमी होतात.

हेही वाचा
१) नगरकरांनी दिला मदतीचा हात! कोविड रुग्णांनासाठी जमवले इतके रोख रुपये, तसेच केला धान्यसाठा जमा…
२)ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या झाडाचे पान ठरते फायदेशीर, पहा अजून काय गुणधर्म आहे या झाडांमध्ये..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button