ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
प्रश्न तुमचे उत्तर आमचे !

प्रश्न तुमचे उत्तर आमचे: शेतकरी हित हेच आमचे ध्येय! पहा: श्री अमोल तकभाते यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर…

Questions Your answer is ours: Farmers' interest is our goal! See: Answer to the question asked by Mr. Amol Takbhate

प्रश्न:
मी 900 झाडे आंबा लावला आहे मला खते,
छाटणी, खोड मजबूत होणे, झाडांची वाढ, माल
जास्त येणे तसेच इतर माहिती मिळावी ही विनंती,
श्री. अमोल ताकभाते
उत्तर:

संकरित जाती:
हापूस, केसर, रत्ना, सिंधू, कोकण रुची, कोकण राजा, सुवर्णा, सम्राट, पायरी, लंगडा, वनराज

खते व्यवस्थापन:
एक वर्ष वयाच्या झाडास १५ किलो कंपोस्ट खत, १५० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद १०० ग्रॅम पालाश पावसाळ्याच्या सुरुवातीस चर खोदून द्यावेत. दरवर्षी ही मात्रा समप्रमाणात वाढवून १० व्या वर्षापासुन प्रत्येक झाडास ५० किलो कंपोस्ट खत, १.५ किलो नत्र, ५०० ग्रॅम स्फुरद व १ किलो पालाश बांगडी पद्धतीने जून महिन्यात द्यावे.

हेही वाचा: आणखीन दोन दिवस बरसणार अवकाळी पावसाच्या सरी, कोणत्या जिल्ह्यात होणार पावसाचे आगमन सविस्तर बातमी.

पाणी व्यवस्थापन:
पाण्याची उपलब्धता असल्यास फळधारणेनंतर ३ – ४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

कीड व रोग नियंत्रण:

तुडतुडे :- पिल्ले व पुर्ण वाढलेले तुडतुडे कोवळी पाने, मोहोर व छोट्या फळांच्या देठातून रस शोषतात. यामुळे पाने वेडीवाकडी होतात, पालवी कोमेजते, मोहोर गळतो. तसेच छोटी फळेही गळतात. मोहोराच्या वेळी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवतो. किडीच्या नियंत्रणासाठी बागेत पुरेसा सुर्यप्रकाश राहील अशा प्रकारे फांद्यांची विरळणी करावी. वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करुन तुडतुडे पिलांच्या अवस्थेत असतानाच डायमेथोएट ३० ई.सी (१० मिली/१० ली) किंवा मेनिट्रोथिऑन (५० ई.सी (१० मिली/१० ली) कीटकनाशकाची फवारणी करावी.

हेही वाचाखाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा डाऊनलोड करा, “मी E शेतकरी अँप” आणि आजच स्मार्ट शेतकरी.

मिजमाशी :- मिजमाशी कोवळ्या पालवीच्या दांड्यावर, पानांच्या देठावर, मोहोराच्या मधल्या दांड्यावर, तसेच मोहोराच्या तु-यांवर अंडी घालते व त्यातुन बाहेर येणारी पांढरट पिवळसर अळी आतील पेशींवर उपजीविका करते. परिणामी त्या ठिकाणी बारीक फुगारे काळी गाठ तयार होते. अशा असंख्य गाठी पालवीवर व मोहोरावर दिसून येतात. व त्यामुळे पालवी व मोहोर करपतो. जून जुलैमधील पालवीवरील मिजमाशीचे नियंत्रण करण्यासाठी पावसाळ्यात उघडीप पाहून डायमेथोएट ३० ई.सी (१० मिली/१० ली) किंवा मेनिट्रोथिऑन (५० ई.सी (१० मिली/१० ली) फवारावे. या कीडीची अळी जमिनीत कोषावस्थेत जात असल्यामुळे पाऊस थांबल्यावर झाडाखालची जमीन नांगरुन त्यात मिथील पॅराथिऑनची भुकरी मिसळावी.

हेही वाचाआशादायक! अश्या पदधतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ही बनणार कोवीड टेक केअर सेंटर…

फुलकिडे :- फुलकि़डे पानांची खालची बाजू तसेच मोहोराचे दांडे व फुले खरवडतात यामुळे पाने वरच्या बाजूला वळून पानाचा रंग करडा बनतो. मोहोर तांबूस होऊन गळतो व फळधारणा होत नाही. फळांची साल खरवडून त्यातून येणारा रस शोषतात. फुलकिडीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर – फेब्रुवारी महिन्यापर्यत दिसून येतो. फुलकिडीचा सिरटोथ्रिप्स डार्सेलिस या प्रजातीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ई.सी (१०मिली/ १० ली) किंवा फोझॅलॉन ३५ ई.सी. (१०मिली/ १० ली) या किटकनाशकाची फवारणी करावी. आंबा फळावर आढळून येणा-या थ्रिप्स प्लॅक्स व (२.५ मिली/ १० ली) व त्यानंतर आवश्यकता भासल्यास थायमेथोक्झाम २५ WG (२ग्रॅम/१० ली) या कीटकनाशकाची फवारणी करावी.

हेही वाचाऑक्सीजन चा तुटवडा ही कमी होणार मोदी सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय सविस्तर वृत्तान्त

फळमाशी :- फळ पिकण्याच्या अवस्थेत असताना मादी फळांच्या सालीत अंडी घालते. त्यातून बाहेर येणा-या अळ्या गरावर उपजीविका करतात. किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त फळे नष्ट करावीत. झाडाखाली जमीन नांगरावी. कामगंध सापळे वापरावेत.
रोग

भूरी :- मोहर व कच्च्या फळांची गळ होते. नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने, मोहर नष्ट करावेत. ०.२% गंधकाची पहिली फवारणी करावी. १५ दिवसांनी ०.१ % डिनोकॅपची दुसरी फवारणी करावी.

डायबॅक :- रोगग्रस्त फांद्या शेंड्यापासून वाळायला लागतात. नियंत्रणासाठी निरोगी कलमांची निवड करावी. रोगग्रस्त फांद्यांची ३ इंच खालपासून छाटणी करावी. त्यानंतर ०.३ % ऑक्झीक्लोराइडची फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
http://krishi.maharashtra.gov.in/Site/Home/CategoryContent.aspx?ID=403faff7-9f23-4d24-816e-94585f5f7add

हेही वाचा
१) नगरकरांनी दिला मदतीचा हात! कोविड रुग्णांनासाठी जमवले इतके रोख रुपये, तसेच केला धान्यसाठा जमा…
२)ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी या झाडाचे पान ठरते फायदेशीर, पहा अजून काय गुणधर्म आहे या झाडांमध्ये..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button