कृषी सल्ला

डिजिटल पेमेंटचा (RTGS, NEFT) वाढला कमालीचा वेग !! तर व्याजदरांमध्ये कोणतेही बदल नाहीत. पाहुयात, आरबीआई (RBI) ने अजून काय बदल केले आहेत…

Digital Payment (RTGS, NEFT) has increased tremendously !! So there are no changes in interest rates. To see what other changes the RBI has made, read the detailed news…

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिवसेंदिवस डिजिटल पेमेंट (Digital Payment) द्वारे आर्थिक व्यवहार प्रचंड होत आहेत. अनेक जण बँकेमध्ये न जाता ऑनलाईन (online ) व्यवहार करत आहेत मुळे रिझर्व बँक ऑफ इंडिया(RBI) ने आर्थिक धोरण समितीच्या आढावा बैठकीत मोठी घोषणा केली आहे.

या घोषणेत असे नमूद केले आहे की आरटीजीएस, (RTGS) आणि एनईएफटी( NEFT) व्यवहार करण्याकरता ग्राहकांना बँकेची गरज लागणार नाही. आरटीजीएस, आणि एन ई एफ टी व्यवहारांमुळे काही मिनिटात ग्राहकांना पैसे ट्रान्सफर करता येतील असे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या घोषणेत म्हटले आहे. ही सेवा फक्त बँकिंग. (banking) कंपनीसाठी लागू नाही तर नॉन बँकिंग (non banking) कंपनी साठी सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे या सुविधेचा उपयोग निश्चितपणे ग्राहकांना होणार आहे. यापूर्वीही डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आरटीजीएस आणि एनईएफटी सेवा आरबीआयने (RBI ) मोफत केल्या गेल्या.

व्याजदरामध्ये ( Interest rate) मध्ये कोणताही बदल नाही.

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पहिल्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याज दरात कोणताही

बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button