ताज्या बातम्या

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना यावर्षी परीक्षा न घेताच सरसकट उत्तीर्ण या निर्णयाचा विद्यार्थ्यांवर भविष्यात काय परिणाम होणार….

What will be the effect of this decision on the students of class I to VIII in the future without passing the examination this year?

गेल्यावर्षी कोरोनाचे ( covid-19) संकट आले होते कोरोना लस आल्यावर सर्व घडी व्यवस्थित होईल असा अंदाज होता मात्र कोरोना लसीकरण सुरू होऊन सुद्धा कोरोनाचे च थैमान थांबले नाही. त्यामुळे साहजिकच लॉकडाऊन होणार की काय अशी सर्व क्षेत्रामध्ये भावना निर्माण झाली.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली ते आठवी महत्वपूर्ण निर्णय घेतला तो असा की, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना यावर्षी परीक्षा न घेताच सरसकट उत्तीर्ण करण्याचा हा निर्णय तीन एप्रिल रोजी त्यांनी सांगितला. परंतु या निर्णयाने कोरोना प्रश्न संपणार आहे का? कदाचित कोरोनाची दुसरी लाट येईल असे तज्ञांचे मत आहे मात्र या निर्णयाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर तर पडणार नाही ना? काय होतील त्याचे परिणाम? हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही महाराष्ट्र राज्याबरोबरच राजस्थान, ओडिशा, तामिळनाडू, छत्तीसगड, आसाम इत्यादी राज्यांनाही अशाच स्वरूपाचे निर्णय घेतले आहेत.

परंतु कर्नाटक राज्याने मात्र विद्यार्थ्यांना ( Student ) परीक्षेविना पुढील इयत्तेत ढकलले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.कोरोनामुळे अनेक क्षेत्रांमध्ये नुकसान झाले त्यातून शिक्षण क्षेत्रामध्ये एक नवीन संकल्पना पुढे आली ऑनलाईन ( Online) शिक्षण पद्धती.
कोरोनामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला हे मात्र निश्चित ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षणाचे तर बाराच वाजले आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी ज्ञान किंवा कौशल्ये कितपत आत्मसात केली आहेत, याचे मूल्यमापन न करताच, त्यांना पुढील इयत्तेत ढकलणे कितपत योग्य आहे? परीक्षा न घेऊन, पुढील स्पर्धात्मक आयुष्यासाठी स्वतःला तयार करण्याची संधीच त्यांच्याकडून हिरावून घेत आहोत.

सीबीएसई, आयसीएसई या शिक्षण मंडळांनी शाळांनी ऑनलाईन परीक्षा घेतल्या आहेत. परीक्षा न देताच पुढील वर्गात जाण्याची आजची संधी, राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकते

.देशातील काही राज्यांनी तेथील विद्यार्थ्यांना टॅबलेट ची सुविधा (Tablet ) करून दिली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे ऑनलाईन शिक्षण प्रणाली पोचू शकते महाराष्ट्रात देखील ही योजना राबवून राबवली जाणार होती परंतु अजून तरी ही योजनाची अंमलबजावणी झाली नाही. विद्यार्थ्यांना टॅबलेट चे वाटप वाटप झाले असते तर किमान विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे ज्ञान अर्जित करू शकले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button