ताज्या बातम्या

पहिली ते आठवी पाठोपाठ आता इयत्ता नववी व इयत्ता अकरावीची परीक्षा होणार नाही…. तर दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन

After class I to VIII, there will be no examination for class IX and class XI. So 10th and 12th exams are offline

कोरोनाच्या पार्श्वभूमी लक्षात घेता, 3 एप्रिल रोजी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचे जाहीर केले होते.

मात्र आज इयत्ता नववी व इयत्ता अकरावीची परीक्षा होणार नाही या इयत्तेतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढील वर्ग टाकण्याचा निर्णय आज घेण्यात आला. अकरावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाइन होणार यामध्ये संभ्रम होता परंतु नुकतेच यावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता नववी व अकरावी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचे जाहीर केले.

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय होणार याबाबत अद्यापही विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.


]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाउन केले असल्याकारणाने शनिवारी असणारे पेपर चे काय करायचे या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळाले नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी व वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही याबाबत येत्या एक-दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button