मंत्रिमंडळ बैठकीत दूध भुकटीवर घेण्यात आलेला महत्वपूर्ण निर्णय तुम्ही पाहिलात का? नक्की पहा..
Did you see the important decision taken on milk powder in the cabinet meeting? Check it out.
18 ऑगस्ट 2021 मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे लॉकडाऊनच्या काळातील उर्वरित जी काही दूध भुकटी आहेत त्याचबरोबर बटर देखील आहे, हे दोन्ही महानंदला वर्किंग स्टॉक म्हणून देणार असल्याचे कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. निर्णय हा झाला आहे की लॉकडाऊनच्या काळातील उत्पादित दूध भुकटी आणि बटर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) यांना वर्किंग स्टॉक म्हणून देण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.
वाचा : हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानचा वापर करून मिळावा दुग्ध जनावरांसाठी 10 दिवसात चारा…
त्याचबरोबर लॉकडाऊनमध्ये प्रतिदिन 10 लाख लिटर दूध शेतकऱ्यांकडून घेऊन त्याचे रुपांतरण दूध भुकटीमध्ये करण्याची योजना राबविण्यात आली होती त्या या योजनेत 7 हजार 764 मे.टन दूध भुकटीचे उत्पादन झाले. यापैकी 1500 मे.टन दूध भुकटी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत देण्यात आलेली असल्याचं संगीतलेलं आहे. त्याचबरोबर उर्वरित 6 हजार 264 मे.टन भुकटीपैकी 3017 मे.टन भुकटी एनसीडीएफआय पोर्टलवर विक्री करण्यात आलेली असल्याचं सांगितलं आहे.
महानंदकडे आता या योजनेंतर्गत 3247 मे.टन इतकी भुकटी शिल्लक असल्याचे सांगितले आहे. याशिवाय 4044 मे.टन देशी कुकींग बटर पैकी 3585 मे.टन बटर विकण्यात आले असून 459 मे.टन बटर शिल्लक आहे. शिल्लक राहिलेली भुकटी व बटर हे महानंदला वर्किंग स्टॉक म्हणून व्यवसायासाठी देण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :