हवामान
ट्रेंडिंग

पुडील २४ तासात महाराष्ट्रातील “या” ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता; पहा सविस्तर बातमी..

Chance of rain in "this" place in Maharashtra in next 24 hours; See detailed news ...

उत्तर पाकिस्तानवर एक चक्रीवादळ वर्तुळ कायम असल्याच देखील सांगितलेलं आहे. चक्रीवादळ अभिसरण सरासरी समुद्र सपाटीपासून 7.6 किमी पर्यंत विस्तारित आहे तसेच ओडिशा, छत्तीसगड व लगतचे भाग कमी दाबाचे क्षेत्र असल्याचं देखील सांगितलं आहे त्याचबरोबर हा भाग चक्रीवादळापासून उत्तर तामिळनाडूपर्यंत एक ट्रफ पसरलेला आहे. मान्सून ट्रफचा अक्ष फिरोजपूर, दिल्ली, हरदोई, वाराणसी, डेहरी, जमशेदपूर, कमी दाबाचे क्षेत्र आणि नंतर पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामधून जात असल्याच देखील सांगितलं आहे.

खालील काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता…
कोकण, गोवा आणि उत्तराखंडच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस सांगितलेला आहे. त्याचबरोबर ईशान्य भारत, बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश, आग्नेय राजस्थान, अंदमान आणि निकोबार बेटे, किनारपट्टी कर्नाटक, केरळ, या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस सांगितलेला आहे.

तसेच महत्वाच म्हणजे काही भागांमध्ये हलका ते मध्यम त्याचबरोबर मुसळधार दाट पाऊस पडण्याची शक्यता सांगितली आहे. ती ठिकाणे आहेत .पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात आणि तेलंगणा या भागांमध्ये मध्यम व मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे.

वाचा : तरुण संशोधकांची शेतकऱ्यांसाठी धडपड, शेतीचे नुकसान टाळण्यासाठी उभारलं किफायशीर हवामान केंद्र..

त्याचबरोबर ईशान्य भारताचे उर्वरित भाग आहेत, गंगेच्या पश्चिम बंगाल,बिहारचे काही भाग, झारखंडचे काही भाग, तसेच दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व आणि दक्षिण गुजरात, ओडिशा, आंध्र प्रदेशचा उत्तर किनारा, तमिळनाडू, केरळ, तटीय कर्नाटकचा काही भाग आणि अंदमान व निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडलेला. अशी सूचना हवामान विभागाने दिलेली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button